सध्या रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्याला जगभरातील काही देशांनी विरोध केला आहे. त्यामुळे पुढे तिसरे महायुद्धही होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण या युद्धाचे होणारे परीणामही भयानक असणार आहे. जर अमेरिका आणि रशियामध्ये अणुयुद्ध झाले तर अर्ध्या तासात १० कोटींपेक्षा जास्त लोक मारले जातील. (what happen in nuclear war)
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात अणुयुद्धाचा धोका वाढताना दिसत आहे. युक्रेनला पाठिंबा देताना अमेरिकेसह पाश्चात्य देश त्याला शस्त्रांची मदत करत आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आधीच धमकी दिली आहे की जर कोणताही देश या युद्धात आला तर त्याचे गंभीर परीणाम होतील.
पुतीन यांच्या या इशाऱ्याचा संबंध अणुयुद्धच्या धोक्याशी जोडला जात आहेत. जपानवर यापूर्वी अण्वस्त्र हल्ले झाले आहेत आणि त्या हल्ल्यातून बचावलेले आजही ते दिवस आठवून घाबरतात. इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबोलिश न्यूक्लियर वेपन (ICAN) या स्वित्झर्लंडस्थित संस्थेच्या म्हणण्यानुसार, एका अणुबॉम्बमुळे लाखो लोकांचा एकाच झटक्यात मृत्यू होईल. अणुयुद्धात १० किंवा त्यापेक्षा जास्त बॉम्ब टाकले तर लाखो लोकांचा बळी जाईल.
ICAN च्या मते, एक अणुबॉम्ब संपूर्ण शहर नष्ट करेल. अमेरिका आणि रशिया यांच्यातील अणुयुद्धात ५०० अणुबॉम्ब वापरल्यास अर्ध्या तासात १० कोटींपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होईल. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर इथे प्रत्येक एक किलोमीटरच्या परिघात १ लाखाहून अधिक लोक राहतात.
हिरोशिमासारखा अणुबॉम्ब इथे पडला तर आठवडाभरात ८.७० लाखांहून अधिक लोकांचा बळी जाईल. जर अणुयुद्ध झाले तर २ अब्ज लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर येतील. संपूर्ण आरोग्य यंत्रणा उद्ध्वस्त होणार असून, त्यामुळे जखमींना उपचार मिळू शकणार नाहीत.
सध्या जग ग्लोबल वॉर्मिंगशी झुंजत आहे, पण अणुयुद्धामुळे पृथ्वीचे तापमान झपाट्याने कमी होऊ लागेल. कारण या हल्ल्यांमुळे इतका धूर निघेल की पृथ्वीच्या पृष्ठभागावर जमेल. असा अंदाज आहे की जेव्हा हे घडते तेव्हा किमान १० टक्के ठिकाणी सूर्यप्रकाश पोहचत नाही. जर जगभरातील सर्व अण्वस्त्रे वापरली गेली तर पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फियरमध्ये १५० दशलक्ष टन धूर जमेल. स्ट्रॅटोस्फियर हा पृथ्वीचा बाह्य पृष्ठभाग आहे जो ओझोन थराच्या वर आहे.
जगातील बहुतांश भागात पाऊस पडणार नाही. जागतिक पर्जन्यमान ४५ टक्क्यांनी कमी होईल, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान -७ ते -८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. याची तुलना केली तर, १८ हजार वर्षांपूर्वी जेव्हा हिमयुग होता, तेव्हा तापमान -५ डिग्री सेल्सियस होते. त्यामुळे जग १८ हजार वर्षे मागे जाईल, असेही म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘जिनका नाम नहीं होता उनका नामकरण उनके साथी कर देतें है’; ‘पठाण’चा धमाकेदार टीझर रिलीज
रशियाच्या अणुयुद्धाच्या धमकीमुळे युरोपात दहशत, नागरिकांनी ‘या’ गोळ्या विकत घेण्यासाठी केली गर्दी
विधिमंडळात खाली डोकं वर पाय करणारे आमदार संजय दौंड कोण आहेत? शरद पवारांच्या एका शब्दावर झालते विजयी