Share

‘तुमचे आमदार निर्दोष, अनिलबाबू लवकर बाहेर येतील,’ रोहितदादांनी दिला शब्द

rohit pawar

काही दिवसांपूर्वी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. काल राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा वाढदिवस होता.

अनिल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार रोहित पवार हे काटोल येथे पोहचले होते. यावेळी रोहित पवार यांनी अनिल देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. देशमुख यांच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समिती काटोलच्यावतीने रक्तदान शिबिर व महिला आरोग्य तपासणी शिबिर सोमवारी घेण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते. तसेच अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख या देखील यावेळी उपस्थित होत्या. तसेच रोहित पवार यांनी काटोल पंचायत समितीतील भूमिपूजन सोहळ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला.

राज्यातील सरकार पाडण्यासाठी ईडी आणि सीबीआय या संस्थांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी यांनी मोदी सरकारवर केला. तसेच पुढे केंद्र सरकारला लक्ष करताना रोहित पवार म्हणतात, ‘महागाईचा भडका उडाल्यानंतरही त्यावर न बोलत फक्त विरोधक राष्ट्रपती राजवट राज्यात कशी लागू होईल, यावर भर देत आहेत.’

दरम्यान, ‘सूडबुद्धीनं अनिल देशमुखांवर ही कारवाई करण्यात आली आहे,’ असं देखील रोहित पवार म्हणाले. यावेळी आरती देशमुख यांचे डोळे पाणावले. ‘ईडीवाले शाळेत गेले की नाही मला माहीत नाही. लवकरच अनिल देशमुख बाहेर येतील, असा विश्वास आम्ही देतो. पवार कुटुंब तुमच्यासोबत आहे, असं म्हणत रोहित पवारांनी आरती देशमुख यांना धीर दिला.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘अनिलबाबू यांच्या घरावर १२२ वेळा छापे घालून त्यांचे व परिवाराचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. तुमचे आमदार निर्दोष आहे. देशमुख कुटुंबासोबत पवार कुटुंब आहे. अनिलबाबू लवकर बाहेर येतील,’ असा शब्द त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना दिला.

महत्त्वाच्या बातम्या
‘हे फोटो कोणत्या बागेत काढलेत?’, शिवसेना नेत्यांचे फोटो ट्विट करत भाजपचा संतप्त सवाल
सत्ता डोक्यात जाते, तेव्हा जनताच एक दिवस ती नशा मतपेटीतून उतरवते; चित्रा वाघ किशोरी पेडणेकरांवर भडकल्या
देशातील शाळांना मुलांना ‘पृथ्वीराज’ चित्रपट दाखवणं सक्तीचं करावं; अक्षयने सरकारकडे केली अजब मागणी
राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या भाजप खासदाराला महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा पाठिंबा; फोन केला अन्…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now