Share

हल्मेट घालूनही चालकाला भरावा लागू शकतो २००० रुपयांपर्यंत दंड; जाणून घ्या काय आहे नियम

भारतात वर्षाला हजारो अपघात हे वाहतूकींचे नियम न पाळल्यामुळे होत असतात. हेल्मेट न घालणे, चुकीच्या बाजूने गाडी चालवणे त्यामुळे भयानक अपघात होत असतात आणि त्यामुळे अनेकदा लोकांचा जीवही जातो. पण भारतात अनेकदा नियम पाळणं लोक टाळताना दिसून येतात. (wearing helmet challan is 2000 rupees)

भारतात दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. असे असतानाही काही लोक दुचाकी वापरताना हेल्मेट वापरत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिस हेल्मेटशिवाय दुचाकी किंवा स्कूटर चालवल्यास चलन कापतात. वाहतुकीच्या नियमांनुसार तुम्ही हेल्मेट घालून दुचाकी चालवली तरीही तुमचे चलन कापले जाऊ शकते.

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हेल्मेट घातले असतानाही चलन कापले जाऊ शकते. तुम्ही हेल्मेट घातले असले तरी तुम्हाला २००० रुपये दंड भरावा लागू शकतो. आज आपण याचबाबत जाणून घेणार आहोत. आज आपण त्या मोटार वाहन कायद्याबद्दल जाणून घेणार आहोत.

मोटार वाहन कायद्यानुसार, बाईक किंवा स्कूटर चालवताना स्वाराने हेल्मेट बेल्ट न लावता घातलेले असेल, तर त्याला नियम १९४ डी एमव्हीएनुसार १००० रुपयांचे चलन कापले जाते. तसेच जर कोणी डिफेक्टीव्ह हेल्मेट घातलेले किंवा BIS नोंदणी असलेले हेल्मेट घातलेले आढळले तर, १९४ डी एमव्हीएनुसार चालकाला १००० रुपयांपेक्षा जास्त दंड होऊ शकतो.

दोन वर्षांपूर्वी, केंद्र सरकारने केवळ दुचाकी वाहनांसाठी भारतीय मानक ब्युरो (BIS) प्रमाणित हेल्मेटचे उत्पादन आणि विक्री करणे बंधनकारक केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ते सुरक्षा समितीने मार्च २०१८ मध्ये देशात हलक्या हेल्मेटची शिफारस केली होती.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अलीकडेच सुरक्षा नियम अद्ययावत केले आणि चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकीवर नेण्यासाठी नवीन नियम केले. नव्या नियमानुसार दुचाकीवरून जाताना मुलांनी हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच दुचाकीच्या वेगाबद्दलही काही नियम आहे. दुचाकी चालवताना वेग ताशी ४० किमीपेक्षा जास्त असू शकत नाही. नवीन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास १००० रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-
‘स्विगी आणि झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांनाही पैसे द्यायची नाही’; केतकीच्या शेजाऱ्यांनी केली तक्रार
सत्तेचा माज! शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी मुंबईतील कुटुंबाला वाळीत टाकले; वाचा नेमकं काय प्रकरण
कंगनाचा धाकड देणार का भूल भुलैयाला टक्कर? काय सांगतात ऍडव्हान्स बुकिंगचे आकडे?

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now