राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. जवळपास सहा तासांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ईडी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. (we will fight and win said-nawab malik after being arrested by ed)
मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. लढेंगे आणि जितेंगे डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे. अटकेच्या कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी, “मला अटक झालीय, पण मी घाबरणार नाही. मी लढणार आणि जिंकणार,” अशी प्रतिक्रिया दिली.
सध्या नवाब मलिक यांचं जेजे रुग्णालयात अर्धा तास मेडिकल होईल. त्यानंतर न्यायालयात सुनावणी होईल, अशी माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांच्या कार्यालयाकडून एक ट्वीट करण्यात आलं आहे. “जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के गलीयों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इंक्लाब के नारो से…” असं या ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे.
ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने मोठी कारवाई केली आहे.
वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून चोवीस तासात कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यावेळी ईडीकडून मलिकांची रिमांड घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती मिळत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत.
दरम्यान, अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात काही दिवसांपूर्वी एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते. कुख्यात गुंड दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती.
इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढे आल्याचे समजते. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सध्या मिळाली होती. दरम्यान, दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
नवाब मलिक खरंच भंगारवाले होते का? भंगारवाले होते तर त्यांची राजकारणात एन्ट्री कशी झाली?
मोठी बातमी! आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून नवाब मलिक यांना अटक, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
चेन्नई सुपर किंग्सच्या धडाकेबाज खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने पळवले, धोनीला मोठा धक्का
१४ वर्षीय मुलीने लोखंडी तव्याने केली जन्मदात्या आईची हत्या; कारण ऐकून पोलीसही हादरले