Share

युपीत आम्हीच जिंकलोय! ३०४ जागांवर विजयी झाल्याचा अखिलेश यांचा दावा; दिली ‘ही’ आकडेवारी

लखनऊ | आताच झालेल्या युपी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला पोस्टल बॅलेटपैकी ५१.५ टक्के मतदान मिळाले होते. या आधारावर त्यांनी ३०४ जागा जिंकल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठा दावा केला आहे. युपीमध्ये आमचाच विजय झाल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

अखिलेश यादव यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. यादव यांनी ट्वीटमध्ये सांगितले कि, सपा-आघाडीला पोस्टल बॅलेट मतांपैकी ५१.५ टक्के मते मिळाली आहेत. याचाच अर्थ समाजवादी पक्षाने ३०४ जागांवर विजय मिळवला आहे. पुढे ते असेही म्हणाले कि, मी हे निवडणुकीत सपाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या विजयाबद्दलचे सत्य सर्वांसमोर सांगत आहे.

कारण, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत बॅलेट पेपरच्या मतदानात समाजवादी पक्ष ३०४ जागांवर विजयी झाला आहे. तर भाजप फक्त ९९ जागांवर विजय मिळवू शकला. पण ईव्हीएममध्ये भाजपचा विजय झाल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

मात्र, अखिलेश यादव यांनी आम्हीच विजयी झालो असा दावा केला आहे. तसेच त्यांनी या विजयाबद्दल सर्वांचे आभार देखील मानले. ट्वीट करत यादव यांनी सर्वांचे आभार मानले. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये असे लिहिले कि, पोस्टल मतदान करणाऱ्या प्रत्येक सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि मतदारांचे मी मनापासून आभार मानतो.

अखिलेश यादव एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाना देखील साधला. सत्ताधारी पक्षाने हे जाणून घेतले पाहिजे की, फसवणूक किंवा कपट करून सत्ता मिळत नाही. २७३ जागांसह निवडणूक आलेल्या भाजप आघाडीवर यादव यांनी जोरदार निशानेबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशात बहुमत मिळवून भारतीय जनता पक्ष दुसऱ्यांदा सत्तेत उतरला आहे. यामध्ये भाजप आघाडीला २७३ जागा मिळाल्या असून, सपाच्या नेतृत्वाखालील आघाडीला १२५ जागा मिळाल्या आहेत. भाजप, सपानंतर बसपाने १ तर काँग्रेस आणि जनसत्ता दलाच्या उमेदवारांनी प्रत्येकी २ जागा जिंकल्या आहेत.

यादरम्यान, अखिलेश यादव यांच्या या मोठ्या दाव्यावर भाजप नेत्यांनी जोरदार प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला प्रतिक्रिया देतांना म्हणाले कि, निवडणुका केवळ पोस्टल बॅलेटने होत नाहीत. जर असे असेल तर, ईव्हीएमचा अर्थ काय? असा प्रश्न देखील शुक्ला यांनी अखिलेश यादव यांना विचारला.

https://twitter.com/yadavakhilesh/status/1503612365207707648?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1503612365207707648%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref

महत्वाच्या बातम्या:
पोलीस चौकीत ‘झिंग झिंग झिंगाट’, रंगली ‘डर्टी पार्टी’; पोलिसांच्या अब्रूची लख्तरं वेशीवर..
पक्ष, धोरण, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, संभाजीनगरसाठी राजीनामाही देईन; मुनगंटीवार आक्रमक
नरेंद्र मोदी किती वर्षे पंतप्रधानपदी राहणार? स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केली भविष्यवाणी, म्हणाले…
‘या’ कंपनीच्या शेअरने दिला ४,५४,९०० टक्क्याहून अधिक परतावा, गुंतवणूकदार झाले करोडपती

 

इतर ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now