गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील महिला अत्याचाऱ्यांचे अनेक घटना समोर येत आहे. असे असतानाच आता पिंपरी-चिंचवडमधून बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंडवडच्या आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर एका महिलेवर भरदिवसा बलात्कार झाला आहे. (watchmen rape women at pimpri)
याप्रकरणी पोलिसांनी एका वॉचमनवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. प्रेमलोक पार्क चिंचवड येथे संबंधित घटना घडली आहे. १६ मे दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर महिलेने याप्रकरणी २९ तारखेला तक्रार दाखल केली आहे.
महिलेने त्या वॉचमन विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सरोज देवीराम बिस्ता असे त्या आरोपी वॉचमनचे नाव आहे. १६ मे रोजी दुपारी जेवण करुन महिला फेरफटका मारत होती, तेव्हाच संबंधित घटना घडली आहे.
१६ मे रोजी दुपारी त्या महिलेचे जेवण झाले होते. त्यावेळी ती महिला फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडली होती. आरोपी वॉचमनने महिलेला जवळ बोलवले. त्यानंतर जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तो तिला घेऊन गेला आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करु लागला.
महिलेला ही गोष्ट कळताच तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने धमकी देऊन महिलेवर बलात्कार केला, २९ तारखेला पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
सध्या पोलिसांनी वॉचमन असणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक व्यंकट पोटे तपास करत आहे. भरदिवसा बलात्कार झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोण आहे नताशा जिच्यावर फिदा झाला गुजरात टायटन्सचा कर्णधार पंड्या? अनेक चित्रपटात केलं आहे काम
‘या’ गोष्टींमध्ये धोनीच्याही पुढे निघून गेला हार्दिक पंड्या, रोहित शर्माचाही रेकॉर्ड धोक्यात
VIDEO: माफी मागा नाहीतर.., हनुमान जन्मस्थळावरून दोन साधूंमध्ये राडा, भर सभेत उगारला माईक