आता क्रिकेटप्रेमींची उत्सुकता संपली आहे. कारण आजपासून आयपीएलचे सामने सुरु होत आहे. हे आयपीएल सामने पाहण्यासाठी अनेकजण आपले काम सोडून टिव्ही समोर येऊन बसतात. पण आता जिओने एक असा जबरदस्त प्लॅन आणला आहे, ज्यामुळे क्रिकेटप्रेमी चांगलेच खुश झाले आहे. (watch ipl 2022 free jio plan)
इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ आजपासून म्हणजेच २६ मार्चपासून सुरू होत आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. आयपीएल २०२२ चे सामने Disney+ Hotstar आणि JioTV ऍपवर लाइव्ह असणार आहे.
जर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल आणि तुम्हाला IPL बघायला आवडत असेल, तर आम्ही तुम्हाला Jio च्या सर्वात स्वस्त प्लानबद्दल आम्ही सांगणार आहोत, ज्यामध्ये Disney Plus Hotstar वर तुम्ही फ्रीमध्ये आयपीएल पाहू शकतात.Jio च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत, जे Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह येतात.
जर तुम्ही सर्वात स्वस्त योजना शोधत असाल तर त्याची किंमत ४९९ रुपये असेल. Jio चा ४९९ रुपयांचा प्लॅन Disney + Hotstar च्या एका वर्षाच्या सबस्क्रिप्शनसह येतो. त्याची वैधता २८ दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा दिली जाते.
म्हणजेच या संपूर्ण प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना दररोज १०० एसएमएस आणि अमर्यादित कॉल मिळतात. Jio च्या ४९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन, JioTV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud मध्ये मोफत प्रवेश मिळतो.
Jio दोन प्रकारचे सबस्क्रिप्शन ऑफर करते, मोबाइल आणि प्रीमियम. मोबाईल सबस्क्रिप्शनच्या नावावरूनच हे स्पष्ट होते की तुम्ही फक्त मोबाईलवरच याचा आनंद घेऊ शकता. त्याच वेळी, प्रीमियम सबस्क्रिप्शन घेणारे वापरकर्ते ते मोबाइल, पीसी आणि टीव्हीवर वापरू शकतात.
महत्वाच्या बातम्या-
आतापर्यंत फक्त १२ चित्रपट केले, तरीही कोट्यवधींचे मालक आहेत एसएस राजामौली; संपत्तीचा आकडा जाणून बसेल धक्का
रोहितने IPL मध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकूनही धोनीच आहे ‘ग्रेट कॅप्टन’, माजी क्रिकेटपटूने दिला पुरावा
एसटी कर्मचाऱ्यांना अजितदादांनी दिला अल्टिमेटम; “३१ मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा अन्यथा…”;