आयएमआयएमचे माजी आमदार आणि नेते वारीस पठाण (waris pathan) हे सध्या इंदुरच्या दौऱ्यावर आहेत. पठाण यांना काळं फासल्याचा दावा करत एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र या प्रकाराबाबत पठाण यांना विचारलं असताना त्यांनी कॉंग्रेसवर आरोप गेला आहे. (waris pathan criticize on congress)
माध्यमांशी बोलताना पठाण म्हणाले, ‘आपण एका दर्ग्यात गेलो होतो. तिथे चादर पेश केली. तिथे काही तरुणांनी आपलं हार घालून स्वागत गेलं. तसंच एका तरुणानं नजर लागू नये म्हणून लहान मुलांना लावतात ते काजळ लावलं होतं. पण सगळ्या इंदुरमध्ये असं काजळ लावून कसं फिरणार म्हणून मी एका ठिकाणी बसून ते धुतलं. मात्र, काँग्रेसवाल्यांनी तेव्हा फोटो काढून काळं फासल्याची अफवा उठवल्याचा दावा पठाण यांनी केला.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘सगळ्या इंदुरमध्ये असं काजळ लावून कसं फिरणार म्हणून मी एका ठिकाणी बसून ते धुतलं. मात्र, काँग्रेसवाल्यांनी तेव्हा फोटो काढून काळं फासल्याची अफवा उठवल्याचा दावा पठाण यांनी केलाय. तसंच काँग्रेस घाबरली आहे, असे म्हणत पठाण यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण त्यांना काळ फासून पळाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच वारीस पठाण जेव्हा दर्गाहवर चादर चढवून बाहेर येतात. आणि त्यावेळी काही लोक तिथे उभे असतात. त्यातील एकजण त्यांना हार घालतो आणि काळं फासून पळतो.
याचबरोबर तेव्हा तिथे असलेले अन्य काही जण त्या तरुणाला पकडा असा आवाज करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तो गोंधळ ऐकायलाही मिळत आहे. त्यामुळे आता पठाण यांनी आपल्याला काळं फासलं गेलं नाही तर काजळ लावल्याचा दावा केला आहे. मात्र यात नेमकं खरं काय? याबाबत अजूनही प्रश्नचिन्हच आहे. तसेच या घटनेनंतर पठाण आणि एमआयएमचे कार्यकर्ते काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, पठाण यांच्यासोबत घडलेल्या या घटनेचं अनेकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. एका राजकीय व्यक्तीमत्त्वाचं अशाप्रकारे जाहीरपणे अपमान करणं निंदणीय असल्याच्या भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. वारीस पठाण आणि एमआयएम पक्षाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे का? याबाबतची माहिती समजू शकलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
..त्यानंतर संपूर्ण पराभवाचा दोष माझ्यावर टाकण्यात आला, आता हार्दिक पांड्याने केले गंभीर आरोप
आर्ची अन् परशा सैराट! स्वत: रिंकूनेच ‘ते’ खाजगी फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांचा पाय खोलात, केंद्रिय अनुसूचित जाती आयोगाने उचलले मोठे पाऊल
हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकचा 3 दिवस कोठडीत मुक्काम; हिंदुस्तानी भाऊसोबत पोलीस काय करणार?