सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये संघर्ष वाढताना दिसत आहे. आता पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. सर्वसामान्य लोकांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची बाजू मांडणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे.
याच बच्चू कडूंविरोधात आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अकोला जिल्हा न्यायालयाने त्यांच्याविरोधात तपास करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बच्चू कडू अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या आरोपांनुसार, बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्यातील तीन रस्त्यांमध्ये १ कोटी ९५ लाखांच्या आर्थिक अनियमितता केली आहे. याच आरोपांप्रकरणी जिल्हा न्यायालयाने हा आदेश दिला आहे. वंचित बहुजन आघाडीने याबाबत अकोला पोलिसांकडे तक्रार केली होती. पण पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता.
त्यानतंर पोलिस दखल घेत नसल्याने वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्हा न्यायालयात धाव घेतली. तसेच त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही तक्रार केली होती. राज्यापालांनी त्यानंतर योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी याबाबत न्यायालयात पुरावेही सादर केले होते.
त्यानंतर अकोला न्यायालयाने २४ तासांच्या आत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, राज्यात सध्या ईडीच्या धाडींचे सत्र सुरू आहे. अनेक महाविकास आघाडीतील बडे नेते ईडीच्या रडारवर आहेत. काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली कारवाईही करण्यात आली आहे.
त्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा समावेश आहे. ते अद्याप जेलमध्येच आहेत. त्यांची सुटका झालेली नाही. त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे देखील सध्या जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबंधित व्यक्तीसोबत व्यवहार केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आता बच्चू कडू यांच्या नंबर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या
शिवसैनिक असलेल्या चंद्रभागा आजींच्या घराचा पोटमाळा अनधिकृत, राणेंनी केला गंभीर आरोप
फिनीशर धोनीला ‘या’ खेळाडूने रोखले, शेवटच्या 6 चेंडूत करून दिल्या नाहीत 27 धावा,
इरफान पठानने घडवला उमरान मलिकपेक्षा खतरनाक गोलंदाज, पोलिसाची नोकरी सोडून बनला क्रिकेटर
सुंदरतेत बॉलिवूडमधील मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देते सचिनची मुलगी सारा, पहा ग्लॅमरस फोटो