यष्टिरक्षक वृद्धिमान साहाला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर साहाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. या यष्टीरक्षकाला संघातून बाहेर करण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती, मात्र साहाने आतापर्यंत मौन बाळगले होते. (vriddhiman saha on rahul dravid)
अनुभवी यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने शनिवारी खुलासा केला की, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापनाने त्याला निवृत्तीचा विचार करण्यास सांगितले होते. कारण यापुढे निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नव्हता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वृद्धिमान साहाने रणजी ट्रॉफीमधून माघार घेतली कारण त्याला भारतीय संघात निवडले जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. वृद्धिमान साहाने शनिवारी पत्रकारांना सांगितले की, संघ व्यवस्थापनाने मला सांगितले की आता माझ्या नावाचा विचार केला जाणार नाही.
तसेच मी भारतीय संघाचा भाग असेपर्यंत हे मला सांगता आले नाही. प्रशिक्षक राहुल द्रविडनेही मला निवृत्तीचा विचार करावा, असे सुचवले होते, असे वृद्धिमान साहाने म्हटले आहे. रिद्धीमान साहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावरही निशाणा साधला. या यष्टिरक्षक फलंदाजाने दावा केला की सौरव गांगुलीने संघातील त्याच्या जागेची काळजी करू नये, असे आश्वासन दिले होते.
साहा म्हणाला, गेल्या नोव्हेंबरमध्ये कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मी नाबाद ६१ धावा केल्या, तेव्हा दादाने (सौरव गांगुली) व्हॉट्सऍपवर माझे अभिनंदन केले. जोपर्यंत तो बीसीसीआयच्या सर्वोच्च पदावर आहे तोपर्यंत मी कशाचीही चिंता करू नये, असेही ते म्हणाले. मंडळाच्या अध्यक्षांचे अशा प्रकारच्या मेसेजने खरोखरच माझा आत्मविश्वास वाढला. पण सर्वकाही इतक्या झपाट्याने का बदलले हे मला समजत नाही.
दरम्यान, साहाशिवाय अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा यांनाही श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान मिळालेले नाही. पुजारा आणि रहाणे गेल्या काही काळापासून खराब खेळी खेळत आहे. दुसरीकडे, इशांत शर्मा गेल्या वर्षीपासून चांगली कामगिरी करताना दिसून येत नाहीये.
महत्वाच्या बातम्या-
‘जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत तेवढ्या एकदाच देऊन टाका रोज माझ्या आईला त्रास नको’, सोमय्यांचा राऊतांना टोला
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करणे फार सोपे आहे पण.., नाना पाटेकरांचे वक्तव्य चर्चेत
सामना हारला पण क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली, नेपाळच्या विकेट कीपरचं जगभरात होतंय कौतूक; पहा व्हिडिओ