विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन “उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएम मशीनचीच चोरी” झाल्याचा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. वाराणसीला ईव्हीएम घेऊन जात असताना आज एक ट्रक पकडला आहे. यावेळी दोघेजण ट्रक घेऊन पळून गेले आहेत. अशी माहिती अखिलेश यादव यांनी केली आहे.
पत्रकार परिषद घेऊन अखिलेश यादवांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावेळी सरकार मतांची चोरी करत नाही तर ईव्हीएम घेऊन जाणारे एक वाहन कसे पकडले? आणि दोन वाहने पळून का गेली? मतांची चोरी होत नसेल, तर ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाड्यांना प्रशासनाने सुरक्षा का पुरवली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
इतकेच नव्हे तर, ईव्हीएमला मशीन एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायचे असेल तर त्या मतदारसंघातील उमेदवाराला माहिती द्यावी लागते. परंतु वाराणसीला घेऊन जात असलेल्या ईव्हीएमची माहिती संबंधित उमेदवाराला देण्यात आली नसल्याचा आरोप यादवांनी सरकरावर केला आहे.
तसेच यापूर्वी यादवांनी एक ट्विट केले आहे. ज्यात, वाराणसीत ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची बातमी उत्तर प्रदेशमधील प्रत्येक विधानसभेला सतर्क राहण्याचा संदेश देत आहे. मतमोजणीत होणारा हेराफेरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सपा-आघाडीच्या सर्व उमेदवार आणि समर्थकांनी आपापले कॅमेरे घेऊन तयार राहण्याचे आव्हाहन यादवांकडून करण्यात आले आहे.
याचबरोबर, मतमोजणी होईपर्यंत अशा प्रकारांवर लक्ष ठेवा. याबरोबरच ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी कोणीही ये-जा करू नये, याची खबरदारी घ्या असे ही त्यांनी म्हटले आहे. देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचे सांगितले जात आहे.
याकारणानेच मतदान मोजणी अधिकाऱ्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप अखिलेश यादवांनी केला आहे. परंतु त्यांचे हे आरोप कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांनी फेटाळून लावले आहेत.
महत्वाची बातमी
भरधाव बसची मागून धडक, कॉलेज विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ एकदा पहाच
‘माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं, पण…’, फडणवीसांच्या गंभीर आरोपांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
हृदय पिळवटून टाकणारी घटना! बाप-लेकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद
मुस्लिमांच्या भावना दुखावतात म्हणणाऱ्यांना दणका! ‘काश्मीर फाइल्स’वर बंदीची मागणी कोर्टाने फेटाळली