Share

‘भारतातील ब्राम्हणांना वेगळा देश द्या’; कश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक अग्रिहोत्रींनी केली होती मागणी

बॉलिवूड चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री (vivek agnihotri) अनेकदा ट्विटरवर सक्रिय असतात. सध्या ते त्यांच्या द काश्मिर फाईल्स या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या काश्मिर फाईल्स या चित्रपटाने बॉक्स आफिसवर धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी एक ट्विट केले होते ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. पण नंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले होते.

केंद्रातील मोदी सरकारच्या बाजूने बोलणाऱ्या विवेक अग्निहोत्री एका ट्विटमुळे काही दिवसांपुर्वी चर्चेत आले होते. ज्यामध्ये त्यांनी ब्राह्मणांना भारतातून हटवण्याबाबत वक्तव्य केलं होतं आणि त्यांचा वेगळा देश असल्याचा उल्लेखही केला होता. पण वाद निर्माण झाल्यानंतर नंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले होते.

यासाठी सोशल मीडियावरही त्यांना खुप ट्रोल केलं गेलं होतं, तर काही लोकांनी त्यावेळी त्यांचे समर्थनही केलं होतं. विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीले होते की, ‘ब्राह्मणांना भारतातून काढून टाका, त्यांना वेगळा देश द्या, सगळे सुखी होतील.’ वास्तविक, त्यांचे हे ट्विट अभिजित अय्यर मित्रा यांच्या ट्विटनंतर आले होते.

त्यात अय्यर म्हणाले होते की, पालघर मॉब लिंचिंगनंतर ब्राह्मणांना मारण्याचे आवाहन अनेक जण करत आहेत. याशिवाय बंगळुरूमधील ब्राह्मणांना हाकलून देण्याबाबत काहीजण बोलत आहेत. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे, असं ट्विट त्यांनी केलं होतं. विवेक अग्निहोत्रीच्या या ट्विटवर लोक त्यांना ट्रोलही करत होते.

युजर दिलीप मंडल यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना लिहीले होते की, ‘तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जा. वेगळा देश मिळणार नाही. बंटी त्रिपाठी नावाच्या युजरने म्हटले होते की, ‘तुमच्यासारख्या लोकांसाठी तुमचे गुरू नित्यानंद यांनी कैलास नावाचा देश निर्माण केला आहे, तिथे जा.

https://twitter.com/Profdilipmandal/status/1252475431716040704?s=20&t=rqe9Y_sTeKgYLYHM2bt_hw

अधर्म नावाच्या युजरने त्यांना रिप्लाय देताना लिहीले होते की, ‘तुकडे टुकडे गँगचा पर्दाफाश. राष्ट्रवादाच्या नावाखाली लपलेल्या गद्दारांना वेगळे ब्राह्मण राष्ट्र हवे आहे. शमशेर मेमन नावाचा वापरकर्त्याने लिहिले की, शरजील इमाम चक्का जामबद्दल बोलला तर त्याला देश तोडल्याबद्दल आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली! ही व्यक्ती वेगळ्या देशाबद्दल बोलत आहे याला तर त्वरित अटक केली पाहिजे.

देश तोडणाऱ्या अराजक घटकांना प्रोत्साहन देऊ नये, असं ट्विट युजरने केलं होतं. विवेक अग्निहोत्री नेहमी असे वादग्रस्त ट्विट करत असतात आणि युजर्सच्या नजरेत येत असतात. दरम्यान, विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटासाठी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कठीण परिश्रम केले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच इतकी चर्चा झाली कि प्रेक्षकांना हा चित्रपट सिनेमागृहात खेचून आणत आहे.

महत्वाच्या बातम्या
फसवणूक केल्याप्रकरणी प्रवीण दरेकरांच्या विरोधात तक्रार दाखल; भाजप अडचणीत
आजोबांच्या निधनाने भावूक झाली प्राजक्ता गायकवाड, म्हणाली, ‘सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊ असं म्हणून सोडून गेलात’
काश्मिर फाईल्सने दुसऱ्या दिवशीही केली छप्परफाड कमाई, प्रभासच्या ‘राधे-श्याम’लाही टाकले मागे
चीन: लॉकडाऊन लावूनही आटोक्यात येईना कोरोना, ‘या’ शहरात सापडले २७ हजार केसेस

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now