Share

काश्मिरी पंडितांवर बनलेल्या चित्रपटावर ‘आप’च्या माजी नेत्याने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, हा चित्रपट तोच बघेल…

सध्या काश्मिरी पंडितांवर बनलेला ‘द काश्मिर फाइल्स’ हा चित्रपट सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. त्यामुळे तेलुगू निर्माता विवेक अग्निहोत्री देखील चर्चेत आहे. हा चित्रपट कमी बजेटचा असल्याने, त्याचे प्रमोशन कोणत्याही मोठ्या प्लॅटफॉर्मवर झाले नव्हते, तरीही तो खूप चर्चेत आहे. (vishwas kumar on kashmir files)

चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अनेक व्हिडिओ समोर आले, ज्यामध्ये चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक खूप भावूक झाले आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण थिएटरमध्येच रडताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहे.

तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे आभार मानले लोक मानत आहे. या चित्रपटांचे देशभरात कौतूक होत आहे. तसेच काश्मिरी पंडितांचे दु:ख दाखवण्याचे धाडस केल्याने सगळीकडून अग्निहोत्री यांचे कौतूक केले आहे. राजकीय नेते आणि कलाकारही या चित्रपटावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.

आता प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांनीही या चित्रपटाचे कौतूक केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की ८० वर्षे जुन्या महायुद्धाच्या कथांवर अनेक चित्रपट बनवलेले आहे. पण डोळ्यांसमोर घडलेले एक भयानक सत्य अग्निहोत्री यांनी दाखवले आहे. मी नक्कीच हा चित्रपट बघेन, असे कुमार विश्वास यांनी म्हटले आहे.

८० वर्ष जुन्या महायुद्धाच्या ऐकलेल्या कथांवर बनवलेले चित्रपट हे काही लोकांसाठी काळाचे आवश्यक दस्तऐवज आहेत, परंतु डोळ्यांसमोर घडलेल्या भयानक सत्यावर चित्रपट पाहून लोक अस्वस्थ का आहेत? मी चित्रपट लवकरच बघेन कारण सत्य ते सहन करण्याची ताकद माझ्यात आहे, असे ट्विट कुमार विश्वास यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून कुमार विश्वास चर्चेत आले आहे. कुमार विश्वास हे आपचे माजी नेते आहे. कुमार विश्वास हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. पण काही वादांमुळे त्यांनी आपचा राजीनामा दिला होता.

महत्वाच्या बातम्या-
आयुष्यात ऐश्वर्या येताच, सलमानने दिला होता गर्लफ्रेंडला धोका; म्हणाली, “सलमानने मला धर्म…”
‘आई कुठे काय करते?’ मधील अप्पांच्या खऱ्या आयुष्यातील लेकीचा पार पडला लग्नसोहळा; बापलेकीच्या नात्याचा खास व्हिडिओ होतोय व्हायरल
म्हातारी म्हणून बोलवणाऱ्या ट्रोलर्सला श्वेता तिवारीने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, मला आनंद आहे की…

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now