Share

विराटच्या खराब फॉर्मवर वीरेंद्र सेहवागचं मोठं वक्तव्य; म्हणाला, जितक्या चुका त्याने करीअरमध्ये केल्यात…

हा आयपीएल सिजन आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खूपच निराशाजनक राहिला आहे. आयपीएल २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या १६ सामन्यांमध्ये कोहलीच्या बॅटने २२.७३ च्या सरासरीने केवळ ३४१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. (virendra sehwag on virat kohli)

प्लेऑफपूर्वी, किंग कोहलीने फॉर्ममध्ये परत येण्याच्या आशेने नक्कीच ७३ धावांची इनिंग खेळली होती, परंतु प्लेऑफच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने लवकर बाद होऊन चाहत्यांची निराशा केली. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात कोहलीने २४ चेंडूत २५ धावांची संथ खेळी खेळली.

तसेच क्वालिफायर २ मध्ये तो राजस्थानविरुद्ध ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहलीच्या या खराब फॉर्मवर वीरेंद्र सेहवागने मोठं विधान केलं आहे. जितक्या चुका विराटने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये केल्या नसतील तितक्या चुका त्याने आयपीएल २०२२ मध्ये केल्या आहे, असे सेहवागने म्हटले आहे.

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग क्रिकबझच्या शोमध्ये म्हणाला, जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये नसता, तेव्हा तुम्हाला प्रत्येक चेंडू बॅटच्या मधल्या भागातून खेळावा लागतो. जर चेंडू बॅटच्या मध्यभागी आदळला, तर तुम्हाला आत्मविश्वास मिळतो आणि तुम्हाला चांगल्या धावा करता येतात.

पहिल्या ओव्हरमध्ये विराट नक्कीच चांगला खेळायचा, काही वेळानंतर तो बाहेरचे चेंडू मारण्यास सुरुवात करायचा. पण जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये नसता तेव्हा तुम्ही बॅटला लागेल असे चेंडू खेळायला हवे, जेव्हा तुम्ही खराब फॉममध्ये असता, तेव्हा तुम्ही जर बॅटला लागणारे चेंडू खेळले तर तुम्हाला क्रिजवरुन टिकून राहता येते, असे वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे.

आम्हाला माहीत असलेला हा विराट कोहली नाही, कदाचित या सिजनमध्ये दुसरा विराट कोहली खेळताना दिसला असेल. कोहलीने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत इतक्या चुका केल्या नसतील, जितक्या चुका त्याने यंदाच्या आयपीएल सिजनमध्ये केल्या आहे, असेही वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे.

जेव्हा तुम्ही धावा बनत असता, तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करण्याच्या नादात वेगवेगळ्या प्रकारे आऊट होतात. यावेळी विराट कोहली सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आऊट होताना दिसला आहे, असेही वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. सध्या वीरेंद्र सेहवागची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे.

महत्वाच्या बातम्या-
“नालायका.. फुकटचा पैसा खायचा, तुम्हाला तर लाथ…”, भर बैठकीत बच्चू कडूंनी केला अधिकाऱ्यांचा पाणउतारा!
‘भाजपचे सर्व नेते हरीशचंद्राची औलाद आहे का? भाजप नेत्यावर ईडी कारवाई का करत नाही?’
रेप सीनसाठी कपडे फाडण्याच्या मागणीवर संतापल्या होत्या जया बच्चन, दिग्दर्शकाला दिली होती ‘ही’ धमकी

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now