भारत आणि श्रीलंकेमधील कसोटी मालिका येत्या ४ मार्चपासून सुरु होणार आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहली आपले १०० कसोटी सामने पूर्ण करणार आहे. या सामन्यांची ताजी क्रमवारी आयसीसीने जाहीर सुध्दा केली आहे. परंतु या सामन्यांच्या तत्पूर्वीच विराटला क्रमवारीत धक्का बसला आहे. टी-२० सांघिक क्रमवारीत भारत २७० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
यामध्ये बाबर आझम टी-२० फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असून श्रीलंकेचा पाथुम निसांका नवव्या स्थानावर आहे. तसेच भारताचा केएल राहुल चार स्थानांनी घसरून १० व्या स्थानावर आला आहे. परंतु या सगळ्यात विराट कोहलीच पहिल्या १० मधून बाहेर पडून १५ व्या स्थानावर पोहचला आहे.
येत्या ४ मार्चला विराट कोहली आपले १०० कसोटी सामने पूर्ण करणार असतानाच त्यापूर्वी तो पहिल्या १० मधून बाहेर पडला आहे. यामध्ये यूएईचा मुहम्मद वसीम १२ व्या स्थानावर आला आहे. यूएईच्या कोणत्याही फलंदाजासाठी सर्वोत्तम क्रमवारी आहे. त्यामुळे याचा फायदा सामन्यात नक्कीच होणार आहे.
या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी, बांगलादेश-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका आणि आयसीसी टी-२० विश्वचषक पात्रता ‘अ’च्या सामन्यांना स्थान मिळाले आहे. मुख्य म्हणजे गोलंदाजी क्रमवारीत तबरेझ शम्सी पहिल्या स्थानावर कायम आहे. परंतु श्रीलंकेचा वानिंदू हसरंग सहाव्या स्थानावर येऊन पोहचला आहे.
यामध्ये भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार १७व्या स्थानावर आहे. याउलट श्रीलंकेचा लाहिरू कुमारा ३७ व्या स्थानावर असून यूएईचा जहूर खान ४२ व्या स्थानावर आहे. तसेच आयर्लंडचा जोश लिटल ४९व्या स्थानावर आणि यूएईचा रोहन मुस्तफा सहाव्या स्थानावर आहे.
येत्या शुक्रवारपासून भारत-श्रीलंका सामन्यांना सुरुवात होणार आहे. याबाबतची माहिती देताना, ‘‘भारत-श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी मोहालीतील पंजाब क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होणार आहे. हा सामना बंदिस्त स्टेडियममध्ये होणार आहे. हा निर्णय यजमान राज्य संघटना घेते. पंजाब क्रिकेट संघटनेने प्रेक्षकांना परवानगी देता येईल, याची निश्चिती केली आहे,’’ असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी मंगळवारी सांगितले आहे.्या
महत्वाच्या बातम्या
“संभाजीराजे पराभूत झाले, तेव्हापासून मी नवस मागणं बंद केलं होतं, पण यावेळी नवस केला कारण…”
भारतावर खुश असलेला रशिया आता भारतीय मिडीयावर झाला नाराज, दिल्या ‘या’ महत्वाच्या सुचना
दारूच्या नशेत असतानाचा विनोद कांबळीचा व्हिडीओ झाला व्हायरल, इमारतीच्या गेटवर धडकवली गाडी
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट; मुंबई-पुण्यासह 14 जिल्ह्यातील निर्बंध हटवले, वाचा नवीन नियमावली