टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली मोहालीत उतरताच १०० कसोटी सामने खेळणारा खेळाडू बनणार आहे. ही कामगिरी करणारा कोहली हा १२ वा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. आतापर्यंत, त्याने जवळपास ११ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत.
तसेच जागतिक क्रिकेटमध्ये त्याच्या चांगल्या फिटनेससाठी देखील तो ओळखला जातो. त्याच्या चांगल्या फिटनेसमुळे विराट कोहलीने अनेक युवा खेळाडू तसेच वरिष्ठ खेळाडूंना चांगल्या फिटनेसकडे नेले आहे. यावेळी, भारताच्या महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने विराट कोहलीचे १०० व्या कसोटी सामन्यासाठी अभिनंदन केले.
सचिनने विराट कोहलीच्या फिटनेसच्या प्रवृत्तीबद्दलचा एक किस्साही शेअर केला. जो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. बीसीसीआयने सचिनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये सचिन तेंडूलकर हा किस्सा सांगताना दिसत आहे. हा किस्सा २०११ चा आहे.
सचिन तेंडुलकरने २०११ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा सांगितला आहे. सचिन म्हणाला, आम्ही २०११ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होतो, तेव्हा आम्ही कॅनबेरामधील थाई रेस्टॉरंटमध्ये अनेकदा जेवायला जायचो. एके दिवशी संध्याकाळी आम्ही जेवण करून परतत असताना विराट कोहली मला म्हणाला, पाजी हे अती होतंय, आता फिटनेसवर लक्ष केंद्रित करा.
https://twitter.com/BCCI/status/1499233100324163584?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1499233100324163584%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fd-941471504064332421.ampproject.net%2F2202230359001%2Fframe.html
सचिनने विराट कोहलीच्या फिटनेस ट्रेंडचे कौतुक केले आणि म्हणाला, तु यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि तु सर्वांसाठी फिटनेस रोल मॉडेल झाला आहे. सचिन तेंडूलकरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ९ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे.
विराट कोहली त्याच्या नेतृत्वाखाली सर्व खेळाडूंना चांगल्या फिटनेससाठी सतत प्रेरित करत राहताना दिसून येतो. फिटनेसशिवाय विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्येही आपल्या फलंदाजीने अनेक विक्रम केले आहेत. आता १०० व्या कसोटी सामन्यात तो काय कमाल करतो? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
विराट जेव्हा मोहालीत उतरेल तेव्हा त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याच्या ७१व्या शतकाची अपेक्षा असेल. विराटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये २७ शतके झळकावली आहेत आणि बऱ्याच काळापासून तो या फॉरमॅटमध्ये शतकाच्या दुष्काळाशी झुंज देत आहे.
महत्वाच्या बातम्या-
शाहरूखचा बहुचर्चित पठाण ‘या’ दिवशी होणार रिलीज, टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
त्याला मी रंगेहाथ पकडले होते तरी मी..; दीपिकाने सांगितला बॉयफ्रेंड रणबीरचा ‘तो’ किस्सा
‘इंडियाज गॉट टॅलेंट’ मधील ‘या’ दोन स्पर्धकांचे नशीब फळफळले, रोहित शेट्टीने दिली चित्रपटात काम करण्याची संधी