भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (RCB) कर्णधारपद सोडले. त्याने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याच्या आधी सांगितले होते की, तो या सिजननंतर संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. (virat kohli on leave rcb captaincy)
आता आयपीएलच्या १५ व्या हंगामापूर्वी विराटने आरसीबीचे कर्णधारपद का सोडले याचा खुलासा केला आहे. स्वतःला वेळ द्यायचा असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे विराटने सांगितले. कोहलीने गेल्या वर्षी त्याच्या चाहत्यांना अनेक झटके दिले होते.
टी-२० विश्वचषकापूर्वी त्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्याने आयपीएलमधील आरसीबीची कमान सोडली. यानंतर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्यानंतर त्याने स्वतः कसोटीचे कर्णधारपद सोडले.
आयपीएलच्या १५ व्या सिजनच्या एक महिना अगोदरच विराटने ‘द आरसीबी पॉडकास्ट’मध्ये कर्णधारपद सोडल्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला, मी अशा प्रकारचा माणूस नाही जो काहीतरी धरून बसतो. जेव्हा मला असे वाटते की मी एखाद्या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही, तेव्हा मी त्यापासून स्वतःला लांब करतो.
विराट कोहली म्हणाला की, एखादा खेळाडू जेव्हा असा निर्णय घेतो, तेव्हा तो काय विचार करतो हे सांगणे कठीण आहे. लोक तुमच्या स्थितीत नाहीत म्हणून त्यांना ते समजतही नाही. ते इतकेच म्हणू शकतात की हे का आणि कसे झाले? अशा निर्णयांनी आश्चर्य वाटायला नको. मला माझ्यासाठी वेळ हवा होता. कामाचा ताण सोडवायचा होता. तर इथेच सगळं संपतं.
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये चॅम्पियन बनू शकलेला नाही. २०१६ मध्ये, विराटच्या नेतृत्वाखाली, संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु सनरायझर्स हैद्राबादने त्यांचा पराभव केला होता. यावेळी कोहलीच्या जागी आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस किंवा ग्लेन मॅक्सवेल असू शकतो.
महत्वाच्या बातम्या-
मराठी चित्रपटाचा साऊथमध्ये डंका! बाहुबली प्रभासने केले ‘सरसेनापती हंबीरराव’चे कौतुक, म्हणाला..
अरे वा! जुन्या स्प्लेंडरला बनवा इलेक्ट्रिक तेही फक्त ‘एवढ्या’ रुपयांत, एका चार्जमध्ये धावणार १५१ किमी
आता मुलीच्या लग्नाची काळजी सोडा, दररोज फक्त १५१ रुपये जमा करा आणि मिळवा ३१ लाख रुपये