Share

चेन्नईचा कर्णधार जडेजाबद्दल माजी क्रिकेटरचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, जडेजा चांगला क्रिकेटर पण तो…

महेंद्रसिंग धोनीने आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच म्हणजेच २४ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले. त्याने १२ सिजन चेन्नईच्या संघाचे नेतृत्व केले होते. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. (virat kohli coach shocking statement about ravindra jadeja)

धोनीकडून संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जडेजाने आयपीएलच्या १५ व्या सिजनसाठी संघाचे नेतृत्व करण्याचा आणि फ्रँचायझीचा वारसा पुढे नेण्याचा आत्मविश्वास दाखवला आहे. आयपीएलमध्ये चार संघांसाठी खेळलेला जडेजा प्रथमच या लीगमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे.

रवींद्र जडेजाला सीएसकेचा कर्णधार बनवल्यानंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहे. पण विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी जडेजावर फारसा आत्मविश्वास दाखवलेला नाही. सीएसकेसाठी जडेजा चांगला कर्णधार ठरेल याची त्यांना खात्री वाटत नाही.

कधी-कधी चांगला क्रिकेटपटू चांगला कर्णधार नसतो, असे म्हणत त्यांनी आपली रवींद्र जडेजाबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते, जडेजाला कर्णधारपदाचा अनुभव नाही. यूट्यूब पॉडकास्ट खेलनीती दरम्यान बोलताना राजकुमार शर्मा यांनी हे वक्तव्य केले आहे.

रवींद्र जडेजा हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास आला आहे यात शंका नाही. पण त्याने कधी कर्णधारपद सांभाळले नाही, तसेच त्याच्याकडे तेवढा अनुभव नाही, त्यामुळे हे पाहावे लागेल की तो कितपत प्रभावी सिद्ध होणार आहे, असे राजकुमार शर्मा यांनी म्हटले आहे.

राजकुमार शर्मा यांच्या मते, काही वेळा चांगला क्रिकेटर हा चांगला कर्णधार असतोच असे नाही.आयपीएल २०२२ चा पहिला सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात रवींद्र जडेजा प्रथमच चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

चेन्नई आणि कोलकातामध्ये होणारा हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दोन वेळच्या चॅम्पियन केकेआरच्या संघानेही श्रेयस अय्यरला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे आता दोघांमध्ये होणारी लढत बघण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या-
केकेआरविरुद्धच्या सामन्यात धोनी बनवणार ‘हा’ मोठा विक्रम; होऊ शकतो विराट, रोहितच्या लिस्टमध्ये सामील
नराधम कुटुंबीयांनीच लुटली अल्पवयीन मुलीची अब्रु; वडील, मामाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन..
RRR चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी चाहत्यांनी केली थिएटरची तोडफोड; व्हिडिओ आला समोर

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now