भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. रनमशीन म्हणून संपूर्ण जगात ओळख बनवणारा विराट कोहली आयपीएलमध्ये तीनदा शून्यावर बाद झाला आहे. त्याच्या फलंदाजीवर बोलताना भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याने ब्रेक घ्यावा, असे म्हटले आहे. (virat kohli answer to trollers)
विराटवर त्याच्या फॉर्ममुळे सातत्याने टीका होत आहे. त्याचा खराब फॉर्म पाहता त्याला आयपीएलनंतर सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते, असेही बोलले जात आहे. त्याला सध्या आरामाची खुप गरज आहे, असे वक्तव्य अनेक दिग्गजांनी केले आहे.
अशात त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर अनेक टीका होत आहे. अनेकांनी तर त्याला संघातून काढून टाका असेही म्हटले आहे. आता टीका करणाऱ्यांवर विराटने मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहलीने म्हटले की त्याच्याकडे टीका करणाऱ्यांवर एकच उत्तर आहे ते म्हणजे टीव्ही बंद करुन बसणे.
आरसीबीच्या ट्विटर हँडलवर विराट कोहलीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची एक छोटीशी मुलाखत घेण्यात आली आहे. त्यावेळी त्याला अनेक प्रश्नही विचारण्यात आले. यावेळी टीका करणाऱ्यांना तु काय उत्तर देशील? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.
कोहली म्हणाला, मला जे वाटत आहे त्या गोष्टी टीका करणारे कधी अनुभवू शकत नाहीत. ते माझे आयुष्य जगू शकत नाहीत. ते एक क्षणही जगू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा आवाज कसा कमी करायचा. यावर माझ्याकडे एकच उत्तर आहे. ते म्हणजे तुम्ही एकतर टीव्ही बंद करा किंवा लोक काय म्हणत आहेत त्याकडे दुर्लक्ष करा. या दोन्ही गोष्टी मी करतो.
कोहलीने या आयपीएलमध्ये १२ सामन्यांत फक्त २१६ धावा केल्या आहेत. त्याने अर्धशतकही केले आहे. कोहलीने त्याचा माजी सहकारी एबी डिव्हिलियर्सबद्दल सांगितले. तो म्हणाला, मला एबीची आठवण येते. मी त्याच्याशी रोज बोलतो. तो मला सतत मेसेज पाठवत असतो. आम्ही संपर्कात आहोत.
महत्त्वाच्या बातम्या-
मी पुन्हा येईल म्हटलो होतो, तसं आलोही पण काहींनी मला माजी करून टाकले- देवेंद्र फडणवीस
एकतर नातवंडाचे तोंड दाखव नाहीतर…, मुलगा आणि सुनेविरोधात कोर्टात पोहोचले आई-वडील
पैशाच्या चणचणीमुळे साऊथच्या अभिनेत्याने सोडली इंडस्ट्री; उपजीविकेसाठी करणार सफाईचे काम