टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. विराट कोहलीच्या या कृतीवर सर्वजण त्याच्यावर भडकले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी विराट कोहलीने राष्ट्रगीत चालू असताना असे काही केले की ज्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आणि कोहलीवर संताप व्यक्त केला आहे.
झाले असे की दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यादरम्यान विराट कोहली एक लज्जास्पद कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना विराट कोहली चिंगम चघळताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कोहलीला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. अनेकजण त्याच्या या कृतीवर संतापले आहेत. राष्ट्रगीताचा अपमान केल्याबद्दल चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले. ही मालिका सुरू होण्यापुर्वी विराट कोहलीने खेळाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडले आहे. अशा परिस्थितीत कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर विराटचा हा प्रकार चाहत्यांना आवडला नाही.
विराट कोहलीच्या चुकीमुळे चाहते आणि टीकाकार चांगलेच नाराज झाले आहेत. यानंतर लोकांनी बीसीसीआयकडे विराटवर कारवाई करण्याची मागणीही केली. एक संतापलेला चाहता म्हणाला की, तुला जर बीसीसीआय आवडत नसेल तर तु पाकिस्तानात जा. दरम्यान, टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून तिसऱ्या वनडेतही पराभवाचा सामना करावा लागला.
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 3-0 असा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिका 1-2 ने गमावल्यानंतर विराट कोहलीने खेळाच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपदही सोडले होते. T20 विश्वचषक 2021 नंतर, विराट कोहलीने T20 क्रिकेटमधून कर्णधारपद सोडले, परंतु त्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधारपदावरून काढून टाकले.
एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याने विराट चांगलाच नाराज झाला होता. यालाच प्रत्युत्तर म्हणून विराटने सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडून फक्त फलंदाज म्हणून खेळण्याचा निर्णय घेतला. के एल राहुलला कर्णधारपद देण्यात आले आहे. पण के एल राहुलने कर्णधार असताना पहिलीच सिरीज गमावली.
https://twitter.com/IMsukhveer45/status/1485230909213134849?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1485230909213134849%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmulukhmaidan.com%2Fwp-admin%2Fpost.php%3Fpost%3D108209action%3Dedit
महत्वाच्या बातम्या
‘ताई उठ ना गं…डोळे उघड, बघ तुझा दादा आहे मी’; महिन्यावर लग्न आलेल्या बहिणीचा भावासमोरच तडफडून गेला जीव
“मी आधी त्यांना पाठिंबा दिला होता पण…; किरण माने यांनी राजकारणात यावं”
‘पुष्पा’च्या यशानंतर शरद केळकरने व्यक्त केली भिती; म्हणाला, आपण आपलं मुळ विसरतोय त्यामुळं..
बोनी कपूर यांनी शबाना आझमीसोबत केला डान्स; व्हिडिओ पाहून जान्हवी म्हणाली, पापा….