Share

“काही जण जसं लोकशाहीला पायदळी तुडवतात तसे सर देखील मला पायदळी तुडवतात”

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन पुर्ण भारतात मोठ्या थाटात साजरा झाला. शाळांमध्येही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी लहान मुलं स्टेजवर येऊन भाषण देतात. अशाच एका चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे ज्याने धुमाकूळ घातला आहे.

शाळेत असताना तुम्हीही अनेकवेळा भाषणं केली असतील. काहीवेळा असं होतं की, भाषण पाठ केल्यानंतर व्यासपीठावर गेल्यावर अनेकजण ती विसरतात. यानंतर सगळ्यांमध्ये एकच हशा पिकतो. अशाच एका भाषणाने विद्यार्थ्यांची मने जिंकली आहेत.

प्रजासत्ताक दिनादिवशी ध्वजारोहनाच्या कार्यक्रमानंतर त्याने हे भाषण दिले. त्याचे भाषण ऐकून शिक्षकही पोट धरून हसले. भारतात आजच्या दिवशीच लोकशाही लागू झाली असं म्हणत त्याने भाषणाला सुरूवात केली आणि एकच हशा पिकला.

भाषण करताना तो म्हणाला की, लोकशाही असल्यामुळे मी खेळतो, मोक्कार धिंगाणा घालतो, माकडासारखा झाडावर चढतो, तर लोकशाही असल्यामुळे माझे वडील मला काहीच बोलत नाहीत. पण काही मुलं माझं नाव शाळेतील सरांना सांगतात.

काही जण जसं लोकशाहीला पायदळी तुडवतात तसंच सर देखील मला पायदळी तुडवतात. पण मी खुप गरीब आहे, माझ्यासारखा गरीब अख्ख्या तालुक्यात कोणीच नसेल असं तो म्हणाला आणि सगळेच खळखळून हसू लागले. त्याचे हे भाषण ऐकून उपस्थित सर्वच हसू लागले पण कोणीही त्याला अडवले नाही उलट त्याच्या भाषणाचा आनंद सर्वजण घेत होते.

सध्या त्याचा हा भाषणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांना या चिमुकल्याचे भाषण खुप आवडले आहे. अनेकांनी या चिमुकल्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या
‘मोदी तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत, मी त्यांच्या जागी असतो तर…’; प्रकाश आंबेडकरांचं हैराण करणारं वक्तव्य
मोदी, मनमोहन, अटलबिहारी की इंदिरा? कोण आहे आजवरचा सर्वोत्तम पंतप्रधान? सर्वेक्षणात लोकं म्हणाली…
हार्दीक पांड्याच्या ‘या’ घोडचूकांमुळे भारताने गमावला पहीला ट्वेंटी सामना; न्युझीलंडची १-० ने आघाडी
108 किलो वजन कमी केल्यानंतर पुन्हा वाढले अनंत अंबानींचे वजन; आई नीता अंबानींनी सांगितले ‘या’ आजाराचे कारण

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now