Share

व्हायरल फोटो: उद्योगपती आनंद महिंद्रांनी या फोटोचे वर्षातील सर्वोत्कृष्ट फोटो म्हणून केले वर्णन

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट किंवा व्हिडिओ नेहमी शेअर करत असतात. त्यांच्या ट्विटरवरील पोस्ट गमतीशीर व प्रेरणादायी असतात. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्या पेजवर चांगल्या पोस्ट शेअर करायला विसरत नाहीत.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये एक गरीब वडील उन्हात हातगाडी ढकलताना दिसत आहेत आणि त्या हातगाडीवर त्यांचा मुलगा शाळेच्या गणवेशामध्ये अभ्यास करताना दिसत आहे. हा फोटो पाहिल्यास कुणीही भावुक होईल. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्यांनी ट्विटर हा फोटो टाकत असताना एक विशेष संदेश लिहिला आहे. “आणि हा माझा वर्षातील सर्वात आवडता फोटो. क्षमा करा हा फोटो कोणी काढला, हे मला माहित नाही. त्यामुळे मी फोटोग्राफरला क्रेडिट देऊ शकत नाही. हा फोटो मला माझ्या इनबॉक्समध्ये दिसला. आशा, मेहनत आणि आशावाद यावरच आपण जगत असतो. पुन्हा एकदा नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत”, असा संदेश आनंद महिंद्रांनी ट्विटरवर लिहिला आहे.

हा फोटो उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केल्यानंतर काही वेळातच हजारो लोकांनी त्याला लाईक केले आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर युजर्सकडून शेअर केला जात आहे. या फोटोला ३१ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याच वेळी, तीन हजारांहून अधिक लोकांनी हा फोटो रिट्विट केला आहे.

अनेक यूजर्सनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले – सर, या फोटोमध्ये गरिबी आणि लाचारी दिसत आहे. त्याचवेळी, आणखी एका यूजरने लिहिले आहे – या फोटोमध्ये एक आशा आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना हा फोटो का निवडला असावा? हा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे.

एक आशेचा किरण पाहत, मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक गरीब पित्याने आपला संपूर्ण त्रास आणि अडचणी बाजूला सारल्या आहेत. हा पिता पायी चालत असून त्याने आपल्या मुलाला हातगाडीवर बसवले आहे, जेणेकरून त्याला त्याचा अभ्यास करता येईल. या फोटोचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
त्याला पण माहिती आहे महिंद्राची कार आहे; आनंद महिंद्रांनी शेअर केला कार ओढणाऱ्या वाघाचा व्हिडिओ
‘या’ फोटोतील बिबट्याला जर तुम्ही शोधलं तर तुमची नजर आहे खुप चांगली, ९९ टक्के लोकं झालेत फेल
पंतप्रधान मोदींच्या मेट्रो राईडवर नेटकऱ्यांनी बनवले भन्नाट मीम्स, वाचून पोट धरून हसाल

इतर

Join WhatsApp

Join Now