Share

मुंबईच्या विजयानंतर RCB ने केलं भन्नाट सेलिब्रेशन, विराट तर टिव्हीच्या समोरच लागला नाचायला; पहा फोटो

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. टी २० लीगच्या ६९ सामन्यात शनिवारी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५ गडी राखून पराभव केला. त्यामुळे दिल्लीचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे, तर बेंगलोरला प्लेऑफमध्ये स्थान मिळाले आहे. (viral celebrations photo viral)

आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचताच विराट कोहलीने कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि इतर खेळाडूंसोबत आनंद साजरा केला. या सामन्यात प्रथम खेळताना दिल्लीने ७ विकेट्सवर १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.१ षटकांत ५ गडी राखून लक्ष्य गाठले.

टीम डेव्हिडने फक्त ११ चेंडूत ३४ धावांची जबरदस्त खेळी खेळत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले. मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने २५ धावा देत ३ बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

जर दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा सामना जिंकला असता, तर तो प्लेऑफमध्ये पोहोचला असता, कारण त्यांचा रनरेट आरसीबीपेक्षा चांगला होता. अशा परिस्थितीत आरसीबीचा संघ दिल्लीच्या पराभवासाठी प्रार्थना करत होता. इतकेच नाही, तर त्यांचा सामना पाहण्यासाठी आरसीबीचा संपूर्ण संघ एका ठिकाणी जमला होता.

७.३० वाजल्यापासून संपूर्ण टीम टीव्ही सुरु करुन सामना पाहत असल्याचे फोटो व्हायरल होत होते. सामना ११.३० वाजता संपला. जेव्हा मुंबईचा विजय झाला तेव्हा आरसीबीच्या सर्व खेळाडूंनी जंगी सेलिब्रेशन केले. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विजयानंतर खेळाडूंनी आरसीबी, आरसीबी, आरसीबी… अशा घोषणाही दिल्या. कोहलीने प्रशिक्षक संजय बांगर यांनाही मिठी मारली. यानंतर कोहली म्हणाला, की मुंबईचे खुप खुप आभार. तो टीव्हीच्या समोरच नाचताना दिसून आला. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज म्हणाला की, आम्ही मुंबई जिंकण्याची वाट पाहत होतो.

त्यानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने सांगितले की, आम्ही सुरुवातीपासूनच मुंबईला साथ देत आहोत. त्यांनी जबरदस्त खेळ दाखवला. तसेच त्याने मुंबईच्या खेळाडूंचे कौतूकही केले आहे. सध्या सोशल मीडियावर आरसीबीच्या खेळाडूंच्या सेलिब्रेशनचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
ठाकरे सरकारनं करून दाखवलं! पेट्रोल, डिझेल आता आणखी स्वस्त; जाणून घ्या नवे दर
‘हे होणारच होतं… भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले??,’ राणे थेट पवारांवर बरसले
‘पद्मावतमध्ये सलमानला खलनायक म्हणून पाहायचे आहे’, ऐश्वर्याच्या या अटीवर भन्साळी म्हणाले..

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now