त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. विप्लव कुमार देव हे ७ जानेवारी २०१६ पासून त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. (Vinod tawde going to tripura)
२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विजयाचे नेतृत्व केले. या निवडणुकीत त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली २५ वर्षे सरु असलेल्या राज्य सरकारचा पराभव केला. पण आता विप्लव कुमार यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्रिपुराचे उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा आणि त्रिपुराच्या पहिल्या केंद्रीय मंत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रतिमा भौमिक यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दिसत आहे.
विप्लव कुमार देव यांच्या राजीनाम्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीची कसरत जोरात सुरू झाली आहे. नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी विधीमंडळाची बैठक होणार आहे. अशात आता महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर केंद्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी तावडे हे आगरतळ्यात दाखल झाले आहे.
त्रिपुरात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. निवडणुकीला वर्ष बाकी असतानाच विप्लव कुमार देव यांना हटवण्यात आले आहे. राज्यातील भाजपमध्ये गटबाजी दिसून आली होती. त्यामुळे पक्षातील नेतृत्वाने हे मोठे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.
तसेच दोन दिवसांपूर्वी विप्लव कुमार देव हे दिल्लीला गेले होते. दिल्लीला जाऊन विप्लव कुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली होती. त्याचवेळीच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
त्रिपुरात भाजपची सत्ता आल्यानंतर विप्लव कुमार देव यांच्यावर मुख्ममंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण आज त्यांनी तडकाफडकी राजीमाना दिला आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अशात मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी विनोद तावडे आणि भूपेंद्रकुमार यादव राज्यात दाखल झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ आजारामुळे मालिकेतून काढून टाकल्याचा गंभीर आरोप केतकी चितळेने दिग्दर्शकावर केला होता
केतकी चितळे प्रकरणावर ब्राम्हण महासंघाने दिली धक्कादायक प्रतिक्रिया; म्हणाले, केतकीने जे केले ते…
आधी कर्णधारपद गेले, नंतर संघातूनच बाहेर; काय आहे जडेजाची पडद्यामागची कहाणी?