बॉलिवूडमध्ये आजपासूनच नव्हे तर पुर्वीपासून बोल्ड चित्रपट बनत आले आहेत. यासोबतच चित्रपटात अनेकदा इंटिमेट सीन किंवा गाणीही चित्रित केली जातात, जी प्रेक्षकांना पाहायलाही आवडतात. मात्र, पडद्यावर अतिशय रोमँटिक वाटणाऱ्या या दृश्यांच्या चित्रीकरणामागील कथा कधी कधी खूप विचित्र तर कधी भयावह असते.
बॉलीवूडमध्ये अशा अनेक नायिका आहेत ज्यांना किसिंग सीन किंवा इंटिमेट सीन करताना खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. या अभिनेत्रींनीही आपले अनुभव मोकळेपणाने सांगितले. बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे किसिंग सीन किंवा इंटिमेट सीन करताना अनियंत्रित झाले आहेत. यामध्ये विनोद खन्ना यांचे नाव आहे, ज्यांना असे इंटिमेट सीन करताना अनेकवेळा संवेदना गमवाव्या लागल्या.
माधुरी दीक्षितसोबतच्या त्याच्या इंटिमेट सीनची चर्चा होत असतानाच आणखी एक नायिका होती जिच्यासोबतचा सीन देताना विनोद खन्ना अनियंत्रित झाला. विनोद खन्ना महेश भट्ट यांच्या ‘मार्ग’ या चित्रपटात डिंपल कपाडियासोबत काम करत होते. दोघांना चित्रपटात एक रोमँटिक सीन शूट करायचा होता. दोघांमध्ये एक किसिंग सीनही होता.
मात्र, हा सीन करताना विनोद खन्ना अनियंत्रित झाले आणि दिग्दर्शकाच्या कटानंतरही त्यांनी डिंपल कपाडियोचे चुंबन सुरूच ठेवले. चित्रपटाचा हा सीन रात्री शूट होत असल्याने सेटवरील दिवे पूर्णपणे मंद झाले होते. महेश भट्ट यांनी सीनसाठी अॅक्शन बोलताच विनोद खन्ना आणि डिंपल कपाडियाने किस करायला सुरुवात केली पण कट म्हटल्यावरही विनोद खन्ना थांबले नाहीत.
यामुळे डिंपल कपाडिया खूप घाबरली आणि थेट मेकअप रूममध्ये धावत गेल्याचे सांगण्यात येत आहे. विनोद खन्ना यांनी माधुरी दीक्षितसोबत असेच काहीसे केले. ‘दयावान’ चित्रपटात माधुरी दीक्षित खूप जुने अभिनेते विनोद खन्नासोबत रोमँटिक सीन देताना दिसली होती.
या चित्रपटातही असे इंटिमेट सीन्स देताना विनोद खन्ना यांनी होश गमावला आणि काही वेळ माधुरीचे चुंबन घेत राहिले. यामुळे माधुरी चांगलीच संतापली. दरम्यान, आज डिंपल कपाडियाचा वाढदिवस आहे त्यामुळे आम्ही हा किस्सा तुमच्यासोबत शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
राज ठाकरेंनी खोलले पत्ते; राज्यसभा निवडणूकीत मनसे आमदाराचे मत ‘या’ पक्षाला मिळणार
बापरे! बायकोमूळे राजेश खन्नाने सुपरस्टार मनोज कुमारवर हात उचलला होता; वाचा पुर्ण किस्सा
जेव्हा नेहा कक्करचे गाणे ऐकून अनु मलिकने स्वत:लाच मारली होती कानाखाली, वाचा किस्सा
ज्या मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी विकले घर, आज त्यानेच उभी केली १.१ बिलीयन डॉलरची कंपनी