काश्मिरी पंडितांच्या हत्येवर आधारित असलेला विवेक अग्निहोत्रीचा (vivek agnihotri) ‘द काश्मीर फाइल्स’ (the kashmir files) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. आता आणखी एक बॉलिवूड दिग्दर्शक विनोद कापरी (vinod kapri) ‘गुजरात फाइल्स’ नावाचा त्यांचा पुढचा चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत.
याबाबत त्यांनी ट्विट करून थेट नरेंद्र मोदींना (narendra modi) प्रश्न विचारला आहे. ‘पिहू’, ‘मिस थानकपूर हाजीर हो’ सारखे चित्रपट बनवणाऱ्या विनोद कापरी यांनी या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केले असून, ‘#GujaratFiles’ हा हॅशटॅग देत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी चित्रपट बनवायला तयार आहे आणि त्यात तुमच्या भूमिकेचाही तपशीलवार उल्लेख केला जाईल.
आज देशासमोर तुम्ही मला आश्वासन देऊ शकता का की, तुम्ही माझ्या चित्रपटाचे रिलीज थांबवणार नाही? यानंतर विनोद कापरी यांनी आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘माझ्या या ट्विटनंतर माझी काही निर्मात्यांसोबत चर्चाही झाली. ते #GujaratFiles चित्रपट तयार करण्यास तयार आहेत.
आता पंतप्रधान ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलत आहेत, तेच आश्वासन त्यांनी या चित्रपटासाठीही द्यावे, अशी त्यांची इच्छा आहे. विनोद कापरी यांनी हे ट्विट पंतप्रधानांचा व्हिडीओ असलेल्या एका ट्विटवर केला आहे. ज्यामध्ये ते ‘द काश्मीर फाइल्स’ वर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये पंतप्रधान असे म्हणताना दिसत आहेत, ‘जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन फिरतात, गेल्या ५-६ दिवसांपासून त्यांचा ग्रुप विचलित झाला आहे. ते वस्तुस्थितीच्या आधारावर चर्चा करत नाहीत, तर कलेच्या आधारवर चर्चा करत आहेत. असे म्हणत असताना मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला होता.
पुढे ते काश्मिर फाईल्सबद्दल बोलताना म्हणाले की, कोणी सत्य उघड करण्याचे धाडस केले तर किंवा त्याला वाटलेले सत्य मांडण्याचा प्रयत्न केला तर ते सत्य समजून घेण्याची तयारी नाही, जग पाहतंय ते ही त्यांना पटत नाही, असा प्रकार गेल्या ५-६ वर्षांपासून सुरू आहे असे मोदी म्हणाले होते.
https://twitter.com/vinodkapri/status/1503648995888959488?s=20&t=_br4boUz5IoYAUJT_zldog
महत्वाच्या बातम्या
‘तू बोल्ड फोटोशूट का करत नाहीस?’ चाहत्याच्या प्रश्नावर विद्या बालनने दिले ‘असे’ उत्तर
शेअर बाजारात नुकसान झाल्यामुळे आत्या-भाच्याने संपवले जीवन; सुसाईड नोटमध्ये जे लिहीलं ते वाचून थरकाप उडेल
RRR चित्रपटातील शोले गाण्यात ‘वीर मराठा’ म्हणत शिवरायांचा तुफान जयजयकार; पहा व्हिडीओ
प्रसिद्ध निर्मात्याने काश्मिर फाईल्ससाठी रिकामे केले थिएटर; म्हणाला, ‘राष्ट्र प्रथम, माझा सिनेमा नंतर’