Share

विधान परिषद निवडणुकीत देखील फडणवीसांचा करिश्मा! मविआतील पहिला आमदार फुटला?

राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे.  भाजपने पहिला डाव टाकल्याने महाविकास आघाडीतील एक मत फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा पाहायला मिळाला आहे.

आज विधान परिषदेची निवडणुक पार पडत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. विधान परिषदेच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.

या निवडणुकीत भाजपाला पाच जागा जिंकण्यासाठी १३० मतांची गरज लागेल. राज्यसभेत भाजपाला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. यातूनच भाजपाचे नेते पाचही जागा जिंकण्याबाबत आशावादी आहेत. अशातच मविआतील पहिला आमदार फुटला असल्याची चर्चा सुरू आहे.

महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल हे भाजपला मत देणार असल्याची चर्चा आहे.  भाजपच्या सर्व आमदारांची काल हॉटेल ताजमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत रणनीती ठरवण्यात आली. विशेष बाब म्हणजे भाजपच्या या बैठकीला विनोद अग्रवाल देखील उपस्थित होते.

दरम्यान, अग्रवाल यांनी राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र अग्रवाल यांनी ठाकरे सरकारला दणका दिला आहे. अग्रवाल यांना आपल्या गोटात घेण्यात फडवीसांना पुन्हा एकदा यश आल आहे.

यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आज सकाळी ९ वाजेपासून सुरुवात झाली आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून, पाच वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. यामुळे आजचा दिवस राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. राज्याच लक्ष सध्या या निवडणुकीकडे लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
विधान परिषदेसाठी आज मतदान; मतांची फोडाफोडी होऊ नये यासाठी चारही पक्षांची ‘ही’ जबरदस्त रणनीती
‘मोदींकडून कोणतीही मदत घेतली नाही’; मोदींनी उल्लेख केलेल्या अब्बास अलींचा खुलासा
‘नोटाबंदी केली तेव्हा ५० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि आता अग्निपथ योजनेमुळे…’; ओवैसींची मोदींवर टीका
अखेर सदाभाऊकडून भांडाफोड! ‘तो’ हॉटेलवाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता; पुरावा केला सादर

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now