शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवणी केली आहे. त्यांनी नवीन सरकारही स्थापन केले असून नवीन सरकारचे मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. एकनाथ शिंदे जेव्हा सुरतला गेले होते, तेव्हा शिंदेसोबत कमी आमदार होते, पण त्यानंतर त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली होती. (vinayak raut share dada bhuse incident)
शिवसेनेचे माजी मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे अनेकांनी त्यांना गद्दार म्हटले आहे. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीकाही केल्या होत्या. आता शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दादा भुसे यांचा एक किस्सा सांगितला आहे.
ज्यादिवशी दादा भुसे यांनी बंडखोरी केली, त्याच्या पूर्वसंध्येला ते मातोश्रीवर आले होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी वहिणींनी बनवलेले कांदे पोहे त्यांनी खाल्ले होते. तसेच त्याच्यावर हात ठेवून जिवंत आहे, तोपर्यंत कधीच शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, अशी त्यांनी शपथ घेतली होती, असे विनायक राऊतांनी म्हटले आहे.
दादा भुसे यांनी आपण गद्दारी करणार नाही, शिवसेनेला सोडून जाणार नाही. कधीच उद्धव ठाकरेंना सोडणार नाही, अशी शपथ घेतली होती. पण दुसऱ्याच दिवशी ते शर्टाला हात पुसत गद्दार गटात सामील झाले, असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
बंडखोर आमदारांनो या जन्मात कुठे फेडाल हे पाप? असा प्रश्नही यावेळी विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी बंडखोरी जेव्हा घडत होती, तेव्हा दादा भुसे हे मातोश्रीवर येऊन काय म्हणाले होते. त्याचा किस्सा विनायक राऊत यांनी सांगितला आहे.
उद्धव ठाकरे यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना बोलावून घेतले होते. संध्याकाळची वेळ होती. सात-साडेसात वाजले होते. त्यावेळी रश्मी ठाकरेंनी स्वत:च्या हाताने कांदे पोहे बनवून आणले आणि म्हणाल्या, दादा घ्या. त्यावेळी रश्मी वहिणी म्हणाल्या, की काय हो दादा मी एकलं ते खरं आहे का? तुम्ही सगळेजण साहेबांना सोडून जाताय. त्यावेळी भुसे म्हणाले की, वहिणी समोर अन्न आहे, शपथ घेतो की जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत साहेबांना सोडून जाणार नाही, पण दुसऱ्याच दिवशी ते शिंदे गटात सामील झाले, असे किस्सा विनायक राऊतांनी सांगितला आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘माझी जेव्हा बायपास सर्जरी झाली, तेव्हा एकाही ठाकरेंचा फोन आला नाही, पण एकनाथ शिंदे तीनवेळा भेटून गेले’
संजय राऊतांवर टीका करताना बंडखोर आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली, वाचा नेमकं काय म्हणाले..
मोठी बातमी! NDA कडून जगदीप धनखड लढणार उपराष्ट्रपतीची निवडणूक; भाजपची घोषणा