“पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू”; शिवसेनेचा निर्धार

संपूर्ण महाराष्ट्र इतिहासातील सर्वात मोठ्या राजकीय बंडाचा साक्षीदार होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. शिवसेना जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राजकारणात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.

शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याच दिसत आहे. शिवसेना नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्या आहेत. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी देखील बंडखोर आमदारांवर तिखट शब्दात टीका केली आहे. काही स्वार्थी लोकांनी पक्षाशी गद्दारी केली असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी म्हंटलं आहे की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अजूनही मजबुतपणे काम करत आहे. शिवसेनेनं यापूर्वी देखील अशी गद्दारी पचवली आहे. पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू.’

दरम्यान,  एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भावूक झाले आहेत. ज्यांना शिवसेनेने मोठे केले, सर्वकाही दिले त्यांच्यासोबतच असे वागणे चुकीचे आहे असे सांगताना चंद्रकांत खैरे यांच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी छोट्या शिवसैनिकांना मोठे केले. पद दिले, आमदार केले परंतु त्यांच्या मुलाला आता बाजूला करून स्वतः पद घ्यायचे! ही बंडखोरी करून आमदारांनी पाप केलं आहे.

आमदारांचे हे वागणं म्हणजे बाळासाहेबांना धोका देणं आहे. बंडखोर आमदार संजय शिरसाठ रिक्षाचालक तर मंत्री संदीपान भुमरे कारखान्यात कामगार होते. अशा सामान्य शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठं केलं. आमदार केलं. अशा शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राला बाजूला करून स्वतः पद घेणं हे पाप आहे, असे खैरे म्हणाले.

तसेच म्हणाले, महाविकास आघाडीच्या आग्रहावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारले. अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक कामे केली. शिरसाठ, भुमरे यांनी सर्वात जास्त निधी मिळवला. त्यांना काय कमी केले. त्यांना काय कमी पडलं, असा सवाल त्यांनी बंडखोर अमदारांना केला.

महत्त्वाच्या बातम्या
चंद्रकांत खैरेंना अश्रू अनावर; म्हणाले, बाळासाहेबांच्या मुलाला बाजूला करून स्वतः पद घेणं हे पाप
फायर आजींनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; म्हणाल्या, ‘तो गेलाय पण तुम्ही घाबरू नका..’
गुलाबराव पाटील शिंदे गटासोबत नाहीत, ते तर मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ निरोप घेऊन गुवाहाटीला गेलेत?
संजय राऊतांच्या परतीच्या आवाहनानंतर शिंदे गटाची अट; ठाकरेंनी राजीनामा द्यावा आणि..