शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या आवारात हुज्जत घातल्या प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांच्यासह भाजपच्या अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री उशीरा ओरोस पोलिस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला करण्याच्या मागणीसाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांना जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले होते. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वाभिमान पक्षाच्या लोकांकडून घुडगुस घातला गेला ते योग्य नाही. न्यायालयाचे पावित्र्य राखले पाहिजे. त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
तसेच पोलिसांबरोबर हुज्जत घालण्यापेक्षा अशा प्रकारचे काम केले नसते तर बरे झाले असते. कायद्याचे रक्षण करण्याचे काम पोलिसांचे आहे. कायद्याला अनुसरुन जे आहे ते पोलिस करत आहे. त्यामुळे नितेश राणेंनी दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी पळून जाण्यापेक्षा पोलिसांनी शरण जावे आणि कायद्यानुसार जे आहे ते करावे, असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
निलेश राणेंचे नाटक नेहमीचेच असते मला त्यावर काही बोलायचे नाही. पोलिस योग्य भूमिका घेऊन जे करणे आवश्यक आहे ते करतील. आता खऱ्या अर्थाने नारायण राणेंना माहित पडलं असेल की देशातला कायदा नेमका काय आहे. यापूर्वी त्यांच्या कार्यकिर्दीत मारा ठोका आणि पळून हे सुरु होतं. पण कायद्याचा हात किती लांबपर्यंत जाऊ शकतो हे आता त्यांना कळलं असेल, असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली होती. त्यांच्या नियमीत जामीन अर्जावर संतोष परब यांच्यासाठी ऍड प्रदीप घरत तर आमदार राणे ऍड सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला होता.
महत्वाच्या बातम्या-
.म्हणून असदुद्दीन ओवेसींवर गोळीबार केला, हल्लेखोरांनी सांगितलं धक्कादायक कारण
भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे शिवसेना, भाजपचे ५ हजार कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर
मुलीच्या घटस्फोटानंतर रजनीकांत यांना बसला आणखी एक धक्का, अल्लु अर्जुन आहे कारण