‘आमच्या मनात मुख्यमंत्री म्हणून फक्त देवेंद्र फडणवीसच,’ असा उल्लेख शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. मेटे यांच्या व्यक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
विनायक मेटे यांचा जन्मदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पार पडला. विशेष बाब म्हणजे, या सोहळ्याला उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, आशिष शेलार आणि इ. भाजपचे जेष्ठ नेते उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे, यावेळी कार्यकर्त्यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) अशा घोषणा दिल्या. या कार्यक्रमादरम्यान, बोलताना मेटे यांनी म्हंटलं आहे की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचा आम्हाला आदर आहे पण आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहेत.”
पुढे बोलताना मेटे म्हणाले, ‘तुम्ही श्रीरामासारखे अनेक विकासाचे पूल बांधाल आणि त्यात खारीचा वाटा शिवसंग्रामचा असणार आहे. पण त्या खारीला विसरू नका, त्याला नेहमी जवळ ठेवा. अडीच वर्ष तुम्ही भेटला नाहीत, मात्र रात्री वेशांतर करून तुम्ही प्लॅन करायचे. तुम्ही स्वतःचं सरकार आणून दाखवलं.’
दरम्यान, पुढे बोलताना मेटे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ‘मागचं नालायक सरकार होतं, त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. याचबरोबर ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण यांनी घालवलं. मागील अडीच वर्षात सरकारने केवळ भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप मेटे यांनी केला.
याचबरोबर यावेळी बोलताना फडणवीस यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ‘मला दिल्लीतील नेत्यांनी सरप्राईज गिफ्ट दिले, मुख्यमंत्री ऐवजी मला आमच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री करून सरप्राईज दिले, असं म्हणत फडणवीस यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
महत्त्वाच्या बातम्या
श्रीलंकेमध्ये एका कुटुंबाकडे सत्तेचं केंद्रीकरण झाल्यामुळे परीणाम काय झाले आपण बघतोय, म्हणून..
शिंदे गटात गेल्याने पक्षाकडून विजय शिवतारेंवर मोठी कारवाई; बंडखोरांविरोधात शिवसेना आक्रमक
मुलं ७ ला शाळेत जाऊ शकतात तर न्यायाधीश ९ ला कोर्टात का येऊ शकत नाहीत? न्यायमुर्ती संतापले
..जेव्हा ललित मोदी बनले राजस्थानचे सुपर CM, त्यांच्यामुळे वसुंधरा राजेंची झाली होती बदनामी