vinayak mete death truth revealed | शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचे एका भीषण अपघातात निधन झाले होते. त्याची चौकशी सध्या सुरु असून धक्कादायक माहिती समोर आली आहे. विनायक मेटे यांचा कारचालक एकनाथ कदम यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलिस स्टेशनमध्ये एकनाथ कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमल ३०४ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आल्याचे दिसत आहे.
लवकरच एकनाथ कदम यांना पोलिस अटक करणार आहे. विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट रोजी अपघात झाला होता. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की विनायक मेटे यात गंभीर जखमी झाले होते.
त्यानंतर त्यांना तातडीने नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात आणले होते. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी देखील रुग्णालयात जाऊन तेथील माहिती घेतली होती. तसेच विनायक मेटे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही विनायक मेटे यांनी म्हटले होते.
त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर सीआयडीने विनायक मेटे यांच्या कारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. ज्या ज्या मार्गावरुन विनायक मेटे यांची कार गेली होती. त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज सीआयडीने तपासले होते.
तसेच आयआरबीचे इंजिनियर्स आणि टेक्निकल इंजियनियर्स यांचे एक पथक तयार करण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणाची चूक दिसते? हे जाणून घेण्यासाठी ते पथक तयार करण्यात आले होते. सीआयडीने पाहिलेल्या फुटेजमध्ये गाडी ताशी १२० ते १४० किमी वेगाने चालत असल्याचे दिसून आले.
ज्याठिकाणी अपघात झाला त्याच्या थोड्यावेळाआधी एकनाथ कदमने उजवा टर्न घेऊन ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला ओव्हरटेक करता येणार नाही हे माहित असतानाही त्याने ओव्हरटेक केला होता. त्यामुळे हा अपघात घडला. त्यामुळे एकनाथ कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांना ताब्यात घेणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
ऑdevendra fadanvis : हा देश तोपर्यंत दुर्बल राहील, जोपर्यंत येथील हिंदु समाज…; फडणवीसांचे मोठे वक्तव्य
प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..
छाती नाही हालत, मेला वाटतं तो..; पतीचा खुन केल्यावर प्रियकराला फोन, ऑडिओ क्लिपने उलगडले गुढ