प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..

मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री एंड्रिला शर्माची (Andrila Sharma)प्रकृती चिंताजनक आहे. एंड्रिला शर्मा रुग्णालयात दाखल केले आहे. अलीकडेच तिची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

लोकप्रिय बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री एंड्रिला सध्या रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई लढत आहे. अभिनेत्री एंड्रिलाला अनेकदा हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जात आहे. हृदयविकाराच्या अनेक झटक्यांमुळे तिची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

एंड्रिला शर्माला १५ नोव्हेंबरला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर तिला तातडीने कोलकाता येथील रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचताच तिला कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) देण्यात आले. सध्या तिला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले असून तिची प्रकृती ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. एंड्रिला शर्माच्या या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तिला १ नोव्हेंबरला ब्रेन स्ट्रोकही आला होता. त्यामुळे तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठी झाल्या होत्या. अभिनेत्री एंड्रिला इंट्राक्रॅनियल हेमोरेजने त्रस्त होती. याशिवाय, तिने फ्रंटोटेम्पोरिटल डी-कंप्रेसिव्ह क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया देखील केली होती.

अभिनेत्री एंड्रिलाबाबत डॉक्टरांचे म्हणणे आहे की, नवीन ब्लड क्लोटचे ऑपरेशन करणे शक्य नाही. या गुठी कमी करण्यासाठी औषधे दिली जात आहेत. संसर्ग गंभीर आहे. तिच्या शरीरावर औषधाचा काय परिणाम होतो हे पाहावे लागेल. एंड्रिलालाही दोनदा कर्करोग झाला आहे.

दोन्ही वेळा तिने कॅन्सरची लढाई जिंकली आणि अभिनयात पुनरागमन केले. पण तिचा जीवन संघर्ष अजून संपलेला नाही असे दिसत आहे. एंड्रिला शर्मा ही बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जिने ‘झूमर’ या टेलिव्हिजन शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती अनेक लोकप्रिय शो आणि ओटीटी प्रोजेक्टमध्येही दिसली होती.

महत्वाच्या बातम्या – 

वडिलांनी शिवसेना सोडली तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव आणि आदित्य ठाकरेंसोबत शिवसेनेत

politics : शिल्लक सेनेला शिवतीर्थावरील टोमणे मेळाव्यास परवानगी द्यावी, महाराष्ट्राचे मनोरंजन झाले पाहीजे