देशभरात आशा अनेक घटना घडत असतात, ज्या खूप हैराण करणाऱ्या असतात. आता अशीच एक घटना छत्तीसगडच्या सुरगुजामधून समोर आली आहे. या ठिकाणी काही गावकऱ्यांनी तरुण जिवंत होईल म्हणून त्या तरुणाला चक्क शेणाने गुंडाळून ठेवले होते. (villeger apply cow dung on young boy)
तरुण जेव्हा शेतात काम करत होता, तेव्हा त्याच्या अंगावर वीज पडली होती. त्यामुळे त्याला गावात आणण्यात आले. त्याला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी तरुणाचे शरीर शेणाने गुंडाळून ठेवले होते. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून त्याला तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.
संबंधित घटना ही दरिमा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. कोरवापारा गावात राहणाऱ्या त्या तरुणाचे नाव अमित टोप्पो असे होते. तो फक्त १८ वर्षांचा होता. रविवारी तो वडील ज्योतिष टोप्पो यांच्यासोबत गव्हाच्या शेतात गेला होता. इथे गव्हाच्या कापणीसोबतच दोघेही पहारा देत होते.
अशात तिथले हवामान बिघडले होते आणि वारेही जोरदार वाहू लागले होते. हलक्या रिमझिम पाऊसासह ढगांचा गडगडापण सुरु होता. असे असतानाच तिथे वीज पडली. ज्याचा धक्का अमितला लागला आणि तो खाली पडला. हे पाहून जवळ असलेले त्याचे वडिल त्याला उचलून गावात घेऊन गेले.
त्यानंतर गावतील लोकांच्या सांगण्यावरुन त्याच्या अंगावर शेणखत टाकण्यात आले. त्याच्यावर शेण लावल्याने तो जिवंत होईल असे गावकऱ्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी हा सर्वप्रकार केला होता. त्यानंतर रुग्णवाहिकेलाही तातडीने बोलवण्यात आले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. वीज पडल्यानंतर लगेचच तरुणाचा मृत्यु झाला होता. पण शेण लावल्याने तो जीवंत होईल, असा समज गावकऱ्यांचा होता. त्यामुळे गावकऱ्यांनी त्याच्यावर हा प्रयोग करुन बघितला. पण तसे काहीच झाले नसून त्याचा आधीच मृत्यु झालेला होता.
महत्वाच्या बातम्या-
अजित पवार, दानवे, राणांसह ३७२ बड्या नेत्यांचा वीजबील थकबाकीचा आकडा आला समोर: वाचा यादी
हनुमानाचे नाव ऐकून रावण सुडाने पेटला असेल; राणांची भेट घेतल्यावर चित्रा वाघ मुख्यमंत्र्यांवर संतापल्या
‘खाजगीकरणाची खाज वाढायला लागली, अजून कुठे कुठे खाजवणार?’; उद्धव ठाकरेंचा केंद्राला खोचक सवाल