महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आजही सर्व पक्षातील नेते आठवण काढताना दिसतात. सामान्य जनतेच्या मदतीसाठी ते कधीही धावून येत होते. त्यामुळे त्यांच्या दिलदारपणाचे , मदतीचे अनेक किस्से नेते मंडळी सांगताना दिसतात. कोणी जर समस्या घेऊन आलं तर ते काहीच वेळात ती समस्या सोडवायचे. (vilasrao deshmukh help hostel students)
अनेकदा विलासराव देशमुख हे फोनवरुन, आलेल्या पत्रांतून लोकांच्या समस्या जाणून घ्यायचे आणि ते सोडवायचे. लोकांना सहज संपर्क साधता असा मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांची ओळख होती. आज आपण त्यांचाच एक किस्सा जाणून घेणार आहोत.
२६ मे रोजी विलासराव देशमुख यांची जयंती पार पडली. त्यावेळी मनसे नेते गजानन काळे यांनी विलासराव देशमुखांचा एक किस्सा सांगितला आहे. एकदा वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी रात्री १ वाजता विलासराव देशमुखांना फोन केला होता आणि समस्या सांगितली होती. त्यानंतर सकाळी त्या वसतिगृहाला ४६ लाखांची मंजूरी मिळाली होती.
विद्यार्थी चळवळीत असताना मागासवर्गीय मुलांच्या वरळी हॉस्टेलमध्ये सोयी सुविधा मिळत नसल्याची तक्रार एकदा गजानन काळे यांच्यापर्यंत आली होती. या तक्रारीची दखल काळे यांनी घेतली आणि ते रात्री १२ वाजता सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन हॉस्टेलच्या बाहेर आंदोलनाला बसले.
अशावेळी फक्त घोषणा आणि निदर्शनांनी जमणार नव्हते. त्यानंतर अखेरीस रात्री १ वाजता हिंमत करुन गजानन काळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुखांना फोन लावला. इतक्या रात्री फोन ते उचलतील की नाही किंवा उचलला तर काही बोलतील की नाही याबाबत शंका होती. पण विलासरावांनी त्यावेळी फोन उचलला.
विलासराव देशमुख त्यावेळी विद्यार्थ्यांशी बोलले. त्यानंतर लगेच मुलांच्या कामाला सुरुवात झाली. मुलांना त्यावेळचे सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांचा फोन आला आणि सकाळी मंत्री स्वत: त्या हॉस्टेलमध्ये आले. त्यानंतर तिथल्या समस्या समजून घेतल्या आणि लगेचच हॉस्टेलसाठी ४७ लाख रुपये मंजूर केले.
महत्वाच्या बातम्या-
भाजपकडून सदाभाऊ खोतांना डच्चू? विधान परिषद निवडणूकीत विश्रांती घेण्याचा सल्ला
फोन वाजला अन् रजत पाटीदारने स्वत:च्या लग्नाची तयारी सोडून थेट गाठली IPL, वाचा भन्नाट किस्सा
शाहरूख म्हणाला, माझ्या घरी ३०-४० लाखांचा टिव्ही; युजर्स म्हणाले, शाहरूखला दाखवण्याची..