राजस्थानमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे एका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे. हा तरुण दोन महिन्यापूर्वीच प्रेयसीची हत्या करुन पळून गेला होता. या दरम्यान, तरुणाने आणखी एका तरुणीची हत्या केली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. (vikram bairava rape 50 girls)
आरोपी दुसऱ्या तरुणीला मध्य प्रदेशात घेऊन गेला होता. तिथे तिची हत्या करुन तिला रेल्वे ट्रॅकवर फेकवर फेकून दिले होते. तसेच त्याच्यावर गँगरेपचा गुन्हा दाखल असून गेल्या तीन वर्षांपासून पोलिस त्याचा शोध घेत होती. आरोपीने आर्मी अधिकारी असल्याचे सांगत ५० पेक्षा जास्त मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी शारिरीक संबंध बनवले होते.
विक्रम उर्फ मिंटू बैरवा असे २४ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो धर्मपूरा सैंथल येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला आता हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या विक्रमचा पोलिसांनी अलवर, भिवाडी, दौसा, रेवाडी व सीकर सगळीकडे शोध घेतला होता.
२३ फेब्रुवारी रोजी आर्मी नगर स्थित एका खोलीत हरदोई उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला रोशनीचा मृतदेह अंथरुणावर पडलेला होता. तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारा विक्रम तिचा खून करुन फरार झाला होता, असे डीसीपी रामसिंह शेखावत यांनी सांगितले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत विक्रम म्हणाला की, रोशनीची आणि त्याची भेट मानसरोवरवर झाली होती. त्यावेळी आम्ही दोघेही जयपूरमध्ये एका हॉटेलमध्ये राहत होता. तिथेच आमची मैत्री झाली आम्ही नंतर एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि मग लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागलो. ती काही गोष्टी ऐकत नसल्यामुळे तिची हत्या केल्याचे त्याने कबूल केले आहे.
२०१९ मध्ये अल्वर भागात विक्रमने मित्रांसह एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. गेल्या तीन वर्षांपासून तो फरार झालेला होता. यादरम्यान त्याने मुंबई, चंदीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे अनेक ठिकाणी काम केले होते. त्यावेळात त्याने आर्मी अधिकारी असल्याचे सांगत मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवायचा आणि त्यांच्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचा.
महत्वाच्या बातम्या-
जोरात टॉयलेटला आली म्हणून मैदानातून काढला पळ, ‘या’ खेळाडूमुळे थांबवावा लागला सामना, पहा व्हिडीओ
शेतकऱ्यांनो! आता वीज तोडली तरी घाबरायचं नाय, पठ्ठ्याने आणलाय भन्नाट जुगाड, ट्रॅक्टरपासून होतेय वीजनिर्मिती
औरंगबादेच्या महाराजांचा सेक्स व्हिडीओ झाला व्हायरल, वारकरी सांप्रदायाने केली कारवाईची मागणी