पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाने केलेल्या कारवाईनंतर आता शिवतारे चांगलेच आक्रमक झाले आहेत. “तुम्ही काय हकालपट्टी करणार, मीच शिवसेना सोडलीय” असं शिवतारे यांनी म्हंटलं आहे.
माध्यमांशी बोलताना शिवतारे यांनी म्हंटलं आहे की, ’29 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन मी भूमिका मांडली आहे. त्यात एकच गोष्ट होती. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचं नाही, असं शिवतारे यांनी पुन्हा नमूद केलं.
पुढे बोलताना शिवतारे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ‘शिवसेनेत उभी फूट पडण्यास राऊतच जबाबदार आहेत. त्यांची उद्धव ठाकरेंबाबतची निष्ठा किती आणि शरद पवारांबाबतची निष्ठा किती हे सर्वांना माहीत आहे, असा टोमणा शिवतारे यांनी लगावला.
दरम्यान, विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांची पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच शिवतारे यांचं शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे. ही कारवाई उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार करण्यात आल्याचं वृत्त सामनातून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
शिंदे गट शिवसेनेतून फुटल्यानंतर शिवतारेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेतृत्वावर जहरी टीका केली होती. तसेच एकनाथ शिंदेंची त्यांनी त्यावेळी पाठराखणही केली होती. यामुळे आता पक्षाकडून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, शिंदे गट शिवसेनेतून फुटल्यानंतर शिवतारेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेतृत्वावर जहरी टीका केली होती. तसेच एकनाथ शिंदेंची त्यांनी त्यावेळी पाठराखणही केली होती. यामुळे आता पक्षाकडून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?