राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गद्दारी करणाऱ्यांविरोधात आता शिवसेना देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. शिंदे गटाला समर्थन दिलेल्या नेत्यांची शिवसेनेने थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे.
शिंदे गटात गेल्याने माजी आमदार विजय शिवतारे यांना शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे आता शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.
विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांची पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच शिवतारे यांचं शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे. ही कारवाई उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार करण्यात आल्याचं वृत्त सामनातून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
यावर अद्याप शिवतारे यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र शिंदे गट शिवसेनेतून फुटल्यानंतर शिवतारेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेतृत्वावर जहरी टीका केली होती. तसेच एकनाथ शिंदेंची त्यांनी त्यावेळी पाठराखणही केली होती. यामुळे आता पक्षाकडून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गद्दारी करणाऱ्या संतोष बांगर यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. बांगर (MLA Santosh Bangar) यांनी शिंदे गटात सामील होत पक्षाशी बंडखोरी केली होती.
दरम्यान, बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्यावर देखील शिवसेनेने मोठी कारवाई केली. शिवसेनेकडून तानाजी सावंत यांची सोलापूर जिल्हासंपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिंदे गटातील बंडखोर शिवसेना आमदार यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या-
मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा’, बच्चू कडूंनी टोचले सरकारचे कान
“दोन वाडपे जर व्यवस्थित वाढत असतील, तर ४० जणांची गरज काय?”, सदाभाऊ खोत यांच्या भाषणाची चर्चा
गौतम अदानी बनले जगातले चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्सनाही टाकले मागे