“संजय राऊतांसारख्या लोकांना मातोश्रीने बाजूला केलं पाहिजे, शिवसेना एकत्र येऊ शकते”

सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या नेत्यांकडून वेगवेगळी व्यक्तव्य करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघाला आहे.

अशातच बंडखोर नेत्यांपैकी एक असणारे शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना पुन्हा एक होऊ शकते. पण त्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचं पाऊल उचलण्याची गरज असल्याच शिवतारे यांनी म्हंटलं आहे. सध्या शिवतारे यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जातं आहे.

माध्यमांशी बोलताना शिवतारे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर अजूनही शिवसेना पुन्हा एक होऊ शकते. मातोश्रीने फक्त संजय राऊतांसारख्यांना बाजुला केलं पाहिजे, असं मोठं विधान विजय शिवतारे यांनी केलं आहे.

याचबरोबर ‘उद्धव ठाकरे हे सज्जन व्यक्ती आहेत. मात्र संजय राऊत यांनी शिवसेनेचे वाटोळं केला आहे,या बंडाला संजय राऊत जबाबदार आहेत,’ असं शिवतारे म्हणाले. दरम्यान, अलीकडे अनेक बंडखोर नेत्यांनी संजय राऊत यांना लक्ष केलं आहे. ठाकरे सरकार पडण्यामागे राऊतच दोषी आहे, असं सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे, ‘आमची इच्छा आहे की, उद्धव ठाकरेंनी आम्हाला बोलावावं आणि आम्ही त्यांना भेटायला जाऊ. जर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना बोलावलं तर सर्वजण एकत्र मातोश्रीवर जाऊ,’ अशा भावना  शिंदे गटाचे आणखी एक आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

यामुळे येणाऱ्या काळात खरच शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे. सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकत्र येण्याचे संकेत आलेले नाहीये. मात्र राजकारणात केव्हा काय होऊ शकत याचा अंदाज लावता येत नाही. त्याप्रमाणे भविष्यात पुन्हा शिवसेना एकत्र होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
एकनाथ शिंदेंकडून अब्दुल सत्तारांना बंडखोरीचे गिफ्ट, सत्तार म्हणाले, ‘ही मामुली गोष्ट नाही..’
…तेव्हा उद्धवसाहेब एकदाही बोलले नाहीत हा माझा आमदार आहे; बंडखोर आमदाराने पहिल्यांदाच व्यक्त केली नाराजी
वेस्ट इंडिज सिरीजमध्ये विराटचे नाव का नाही? स्वतः विराटच आहे याला जबाबदार, झाला मोठा खुलासा
इम्रान हाश्मीने कॉफी विथ करणमध्ये व्यक्त केली इच्छा, म्हणाला, मला दिपीकासोबत…