शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या गटाचे एकनाथ शिंदे नेतृत्व करत असून त्यांचा गट दिवसेंदिवस मजबूत होताना दिसत आहे. या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकारही धोक्यात आले आहे. (vijay shivsena join eknath shinde group)
४० पेक्षा जास्त आमदार शिंदे यांच्या गटात गेल्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. अशात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री विजय शिवतारे सुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. विजय शिवतारे हे पुण्यातील मोठे नेते आहे.
विजय शिवतारे यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत आपण शिंदे गटात सामील होणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तालुक्यातील कामे होत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेली युती शिवसेनेने तोडावी, असे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली आहे. ती संघटनेसाठी घेतलेली आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाणार आहोत. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत राहून कामे होत नाही. त्यांची साथ सोडा अशी विनंती एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सर्वजणांनी उद्धव ठाकरेंना केली होती पण त्यांच्या विनंतीला दाद मिळत नव्हती, असे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सज्जन आहेत. पण त्यांना घेरले गेलेले आहे. उद्धव ठाकरेंना आम्ही पत्र देतोय. त्यात आम्ही आमच्या व्यथा मांडल्या आहेत. आमची कामे होत नाहीये. आम्ही बाळासाहेबांचेच शिवसैनिक आहोत, पण महाविकास आघाडीबरोबर नाही. आमचं म्हणणं एकच आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडा, असेही विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
बॉम्बे चौपाटीपासून ते मुंबई रेल्वे स्टेशनपर्यंत, अर्ध्या मुंबईच्या बांधकामामागे आहे ‘या’ व्यक्तीचा हात
…अन्यथा महाराष्ट्रातील मराठा समाज संजय राऊतांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही
कंपनीने चुकून कर्मचाऱ्याला दिला 286 महिन्यांचा पगार, कर्मचाऱ्याने राजीनामा देऊन ठोकली धूम