तुम्हाला साऊथ चित्रपटांचे वेड असेल किंवा नसेल, पण विजय सेतुपती हे नाव तुम्हाला नक्कीच माहित असेल. दमदार अभिनय, संवाद लेखनापासून ते गीतकार आणि निर्मात्यापर्यंत त्यांनी साऊथ फिल्म इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध केले आहे. अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केलेले विजय सेतुपती आज लग्जरी लाईफ जगत आहे.
आज विजयचा वाढदिवसही आहे. त्यानिमीत्ताने चला जाणून घेऊया त्याच्या संघर्षाची कहाणी. अभिनय जगतात येण्यापूर्वी विजय सेतुपती हा अकाउंटंट होता. मात्र, आपल्या आत दडलेल्या अभिनेत्याला त्याने कधीही मरू दिले नाही. आवडीच्या जोरावर छोट्या छोट्या भूमिका करत त्याने खुप नाव कमावले.
2010 मध्ये थेनमुर्क परुवाकाटरू या चित्रपटात त्याला पहिल्यांदा मोठ्या भूमिकेची ऑफर आली होती. विजयने आतापर्यंत ३० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजय सेतुपतीने जीवनात पैसे मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. पोटा पाण्यासाठी त्याने सेल्समन, कॅशियर, फोन बूथ ऑपरेटर म्हणूनही काम केले.
विजयनेही सिमेंट कारखान्यात काम केले आहे. मुख्य भूमिकेतील विजयच्या पहिल्या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यानंतर 2012 मध्ये त्याने केलेले सर्व चित्रपट यशस्वी ठरले. त्यानंतर विजय सेतुपती दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा अभिनेता बनला. आजही विजयचे नाव महागड्या अभिनेत्यांमध्ये गणले जाते.
पिझ्झा, नाडुवुला कोंजाम पक्कथा कानोम, सुधू कव्वाम, सुपर डिलक्स, विक्रम वेधा, मास्टर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. त्याने अभिनयासाठी तीन तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आणि चार राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. विजयने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने खलनायक आणि नायकाचेही काम खुप चांगल्या प्रकारे केले आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की विजय सेतुपतीचे लग्न जेसीशी झाले आहे जिला तो ऑनलाईन भेटला होता. या जोडप्याने 2003 मध्ये लग्न केले. त्यांना मुलगी श्रीजा आणि मुलगा सूर्या अशी दोन मुले आहेत. नुकताच विजयचा मास्टर हा चित्रपट रिलीज झाला होता ज्याला चाहत्यांनी खुप पसंती दर्शवली. या चित्रपटात आपल्याला विजयची खलनायकाची भूमिका पाहायला मिळाली होती. या भूमिकेला लोकांनी खुप पसंती दर्शवली होती.
महत्वाच्या बातम्या
‘विराटने असा निडर संघ तयार केली की जो..,’ कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर जय शाह यांची प्रतिक्रिया
एलॉन मस्क यांच्या ‘त्या’ ट्विटला जयंत पाटील यांचे उत्तर; “आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून…”;
‘कुठला डाॅन आणि कुठला कोण?माझ्या नादी लागाल तर करील ३०२’; लेडी डाॅनचा व्हिडीओ व्हायरल
विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडताच राहुल गांधी कडाडले, म्हणाले…