मध्यरात्री स्टॅन्डवर तरूणी रडणाऱ्या तरूणीला फूस लावून हॉटेलवर नेलं; पुढे घडलं ते पाहून पोलीसही झाले हैराण

Baramati :  बारामती स्टॅण्डवर एक मुलगी रडत बसल्याचे आढळून आले आहे. ती मुलगी पाहुण अनेक जण आश्चर्यचकित झाले. ही मुलगी रात्रीच्यावेळी वणवण भटकत असल्यामुळे येथिल नागरिकांमध्ये चर्चेचा सुरू झाली. घरच्या त्रासाला कंटाळून ही मुलगी घर सोडुन आल्याचे बोलले जात आहे.

रात्री सात वाजता सतरा वर्षांची मुलगी बारामती स्टॅण्डवर उभा होती. तेव्हा तिथे विजय कांबळे हे देखील आलेले होते. ती मुलगी प्रत्येक वाहणाला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, एकही वाहण थांबले नाही.

त्यानंतर विजय कांबळे यांनी त्या मुलीजवळ जाऊन तिची चौकशी केली. त्यावेळी ती मुलगी म्हणाली की, मी घर सोडून निघून आले आहे. मला पुण्याला जायच आहे. गेली दोन दिवस झाले मी घरातून बाहेर पडले आहे. पण जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत.

तिची सगळी माहिती ऐकून घेतल्यानंतर विजय कांबळे यांनी अगदी कौतुकास्पद काम केलं. त्यानंतर त्यांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन गार्गी हाॅटेलमध्ये नेलं. तिथे तुला पैसे देतो आणि पुण्याला सोडत असं सांगितलं. पण त्यांनी त्यावेळी पोलिसांना फोन करून या घटनेची सविस्तर माहिती दिली.

डीवायएसपी इंगळे साहेब आणि पी.आय. महाडिक साहेब यांनी तातडीने घटनास्थळी अधिकारी पाठवले. तोपर्यंत विजय कांबळे यांनी त्या मुलीला कुठेही जाऊन दिले नाही. त्यादरम्यान पोलिसांनी गार्गी हॅटेलमध्ये मुलीची चौकशी केली. त्यानंतर महिला पोलिसांनी बारावीत शिकणार्‍या मुलीला विश्वासात घेऊन ताब्यात घेतले.

ती मुलगी खुप दुखावली होती आणि आई-वडिलांशी वाद घालू घर सोडून आली होती. अवघ्या काही मिनिटांमध्ये विजय कांबळे यांनी मुलीचा विश्वास जिंकला आणि कौतुकास्पद काम केलं आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पण जे काम विजय कांबळे यांनी केलं ते मुलीच्या आई वडिलांना का जमत नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही सर्व माहिती बारामतीचे रहिवासी मच्छिंद्र टिंगरे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –