Share

PHOTO: लायगर चित्रपटासाठी विजय देवरकोंडा झाला न्युड, प्रायव्हेट पार्टवर ठेवला फक्त पुष्पगुच्छ

साऊथचे चित्रपट फक्त त्या राज्यातच नाही, तर देशभरात धुमाकूळ घालत असतात. बॉलिवूडमध्येही साऊथच्या अभिनेत्यांचे खुप चाहते आहे. गेल्या काही दिवसांपासून साऊथचे चित्रपट बॉलिवूडला टक्कर देताना दिसत आहे. रामचरण, एनटीआरनंतर आता साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सुद्धा त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर, ज्यामुळे तो सोशल मीडियावरही ट्रेंड करत आहे. या चित्रपटासाठी त्याने न्युड फोटोशुट केले आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अभिनेता विजय देवरकोंडाने आगामी चित्रपट ‘लायगर’ चे नवे पोस्टर सोशल मीडियावर केले आहे. हे पोस्टर शेअर होताच व्हायरल झाले आहे. लायगरच्या नवीन पोस्टरमध्ये विजय देवरकोंडाने न्यूड लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच, त्याच्या हातात गुलाबाचा पुष्पगुच्छ आहे.

अभिनेता विजय देवरकोंडा याने त्याच्या ट्विटर हँडलवरून त्याच्या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये त्याची बॉडी खुप मस्क्युलर दाखवण्यात आली आहे. लायगरच्या पोस्टरने चाहत्यांमध्ये खूप खळबळ उडाली आहे. कारण ते या चित्रपटाबद्दल आधीपासूनच खुप उत्सुक आहे.

लायगर या चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडा बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. लायगरचे पोस्टर शेअर करताना विजयने लिहिले की, एक असा चित्रपट ज्याच्यासाठी मी सर्व काही दिले आहे. ही भूमिका माझ्यासाठी शारिरिकदृष्ट्या आणि मानकिसदृष्ट्या खुप आव्हानात्मक होती.

प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे विजय देवरकोंडासोबत लायगर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून अनन्या साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण देखील करणार आहे. करण जोहरसह पुरी जगन्नाथ आणि चार्मी कौर हे चित्रपटाचे प्रोड्युसर आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे.

महत्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंचा दुबईतील राईट हॅंड; भाजप नेत्याने नाव फोडत अख्खी कुंडलीच समोर आणली
तुम्हाला शिवसेनेचा व्हिप लागु होतोय का? एकनाथ शिंदेंनी दिले धक्कादायक उत्तर
शिवसेनेच्या ‘या’ आदेशाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवली केराची टोपली; वाचा नेमकं काय घडलं

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now