मात्र या शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले आहे. त्याचबरोबर आता बहुमत चाचणीची अग्नीपरिक्षा पास झाल्यानंतर शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होईल. मात्र मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून शिंदे अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत.
त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. तुमचे आशीर्वाद असू द्या, अशी हात जोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंती केली.
सध्या हे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे. विशेष बाब म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील एकनाथ शिंदे यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. आपले आशीर्वाद असू द्या, मार्गदर्शन असू द्यात आणि हक्काने आदेश देत जा.. असे म्हणत अण्णांना त्यांनी प्रणाम केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
दरम्यान, शिंदे यांनी या व्हिडीओ कॉलवर अण्णा हजारे यांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला. तसेच मी एकनाथ शिंदे बोलत असल्याचं सांगितलं. शिंदे यांनी आतापर्यंत जे काम केलं त्याचीच ही पावती असल्याचंही हजारेंनी यावेळी बोलताना नमूद केलं. सध्या या कॉलची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा सुरू झाली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या व्हिडीओ कॉलमध्ये शेवटी अण्णा हजारे माझी एकच विनंती आहे असं म्हणत आपली एक अपेक्षा व्यक्त करतात. मात्र, नेमका तेथेच हा व्हिडीओ कॉल संपतो. त्यामुळे आता शिंदे यांच्याकडे अण्णा हजारे कोणती विनंती करणार? हे आगामी काळात पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
करोडो रुपये कमवणारा धोनी घेतोय फक्त ४० रुपयांमध्ये उपचार, झाडाखाली बसून लावतोय गुडघ्यांवर औषध
एका भीषण अपघातामुळे झाले ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे करिअर बर्बाद; आज जगतोय असं जीवन
शिवसेनेच्या ‘या’ आदेशाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवली केराची टोपली; वाचा नेमकं काय घडलं