गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहे. नुकतीच त्यांनी एक फेसबूक पोस्ट करत महाराष्ट्राचा खली म्हणून ओळख असलेल्या उमेश वसवेसाठी मदत मागितली होती. त्यानंतर आता एका रात्रीतच त्यांनी उमेश यांच्यासाठी मोठी रक्कम जमा करुन दिली आहे. (vasant more help umesh vasave for operation)
उमेश वसवे हा मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांचा बॉडीगार्ड होता. पण वांजळे यांचे निधन झाल्यामुळे उमेश यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली. अशात त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे वसंत मोरे यांनी पोस्ट करत लोकांना मदतीचे आवाहन केले होते.
वसंत मोरे यांनी फेसबूक पोस्ट करत अनेकांना मदत मागितली होती. त्यांच्या या आवाहनाला लोकांनीही चांगला प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे उमेश वसवे यांच्या शस्त्रक्रियेसाठी आता मोठी रक्कम जमा झाली आहे. याबाबत वसंत मोरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
काल रात्री ११ वाजेपर्यंत उमेश वसवे ( महाराष्ट्राचा खली) याच्या बँक अकाउंट मध्ये फक्त ६ हजार रू. होते. काल मी तुम्हा सर्वांसमोर मदत मागितली आणि तुम्ही सर्वांनी त्याच्या बँक अकाऊंट मध्ये भरभरून दिले, आज दिवसभरात ५ लाख ३५ हजार ५३४ रुपयांचे भरघोस दान त्याच्या झोळीत टाकले, असे ट्विट करत वसंत मोरे यांनी माहिती दिली आहे.
काल रात्री ११ वाजेपर्यंत उमेश वसवे ( महाराष्ट्राचा खली) याच्या बँक अकाउंट मध्ये फक्त६ हजार रू. होते. काल मी तुम्हा सर्वांसमोर मदत मागितली आणि तुम्ही सर्वांनी त्याच्या बँक अकाऊंट मध्ये भरभरून दिले, आज दिवसभरात ५ लाख ३५ हजार ५३४ रुपयांचे भरघोस दान त्याच्या झोळीत टाकले. https://t.co/32LrPRtpZn
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) June 8, 2022
त्याआधी त्यांनी वसंत मोरे यांनी ट्विट करत लोकांना मदतीचे आवाहन केले होते. महाराष्ट्राच्या खलीला गरज तुमच्या मदतीची! हा आहे कै. सोनेरी आमदार रमेशभाऊंचा अंगरक्षक श्री. उमेश रमेश वसवे, सिंहगड वसवेवाडी. वय अवघे ४०. उंची तब्बल ७ फूट, वजन १६५ किलो, अशी प्रचंड शरीर संपत्ती लाभलेला उमेश गेल्या २ वर्षांपासून आजाराने ग्रस्त आहे, असे वसंत मोरे यांनी म्हटले होते.
तसेच पुण्यातील एका नामांकित बिल्डरने त्याचे कष्टाचे पैसे बुडवलेत. मी त्या बिल्डरला फोन केला तर पैसे नाहीत बोलला, ठीके, त्याला थोड्या सवडीने बघतो. जर त्याने या महिन्यात त्याच्या गळ्यावर आणि पाठीवर शस्त्रक्रिया केली नाही तर कदाचित ही आपली मराठी माणसाची संपत्ती मातीतही मिळेल. त्याचे नाशिकला ऑपरेशन करायचे आहे, असे ट्विट वसंत मोरे यांनी केले होते. त्यानंतर एका रात्रीत पाच लाख रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीनेही जाहीर केले विधानपरीषदेचे उमेदवार; एकनाथ खडसेंसह ‘या’ नेत्याला पुन्हा संधी
ताई नाही तर भाजपही नाही, मराठवाड्यातून कमळ हद्दपार करा; भडकलेल्या मुंडे समर्थकांचा मोठा निर्णय
प्रेमाच्या खेळपट्टीवर पृथ्वी शॉ बोल्ड, प्राची सिंहसोबत झालं ब्रेकअप, वाचा कोण आहे प्राची सिंह?