दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडींवर राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं. शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे तब्बल 40 आमदार सामील झाले होते. यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आलं अन् कोसळलं. त्यानंतर शिंदे गटाने भाजपच्या मदतीने राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन केलं.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्विकारला. तर उपमुख्यमंत्री पदाचा कारभार देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारला. विशेष बाब म्हणजे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत मनसेच्या एकमेव आमदारानं देखील विधानसभेत भाजपा आणि शिंदे गटाच्या बाजूनं मतदान केलं.
यामुळे मनसे आणि भाजपाची जवळीक पाहायला मिळत आहे. आगामी पालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची नांदी पाहायला मिळणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकीकडे मनसेने विधानसभेत मतदान करून भाजपा आणि शिंदे गटाला समर्थन दिले आहे.
तर दुसरीकडे मात्र पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी शिंदे सरकारला थेट आव्हान दिलं आहे. ‘तुम्ही किती पण ताकद लावा पुण्याचा महापौर मनसेचाच असेल,’ असं थेट आव्हान मोरे यांनी केलं आहे. यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
मोरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, सरकार बदलले. असे ऐकतोय प्रभाग रचनाही बदलणार आहात आणि म्हणे सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार. माझे सरकारला एक आव्हान आहे, हिम्मत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा पुण्याचा महापौर मनसेचाच असेल.’
सरकार बदलले.
असे ऐकतोय प्रभाग रचनाही बदलणार आहात आणि म्हणे सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार. माझे सरकारला एक आव्हान आहे, हिम्मत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा पुण्याचा महापौर मनसेचाच असेल …#पुणे— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) July 7, 2022
दरम्यान, तर दुसरीकडे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप – मनसे युतीचे संकेत मिळू लागले आहेत. शिंदे गटात सामील झालेले दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवसेना आमदाराने थेट राजसाहेबांची भेट घेतल्याने अनेकांच्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या भेटीमुळे काही राजकीय समीकरण बदलणार का? आता हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे. मात्र आता मोरे यांनी शिंदे सरकारला दिलेलं आव्हान देखील चर्चेचा विषय बनला आहे. शिंदे सरकारला नेमका मनसेचा पाठिंबा आहे की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
२५ पैशांची जुनी नाणी रातोरात बदलू शकतात तुमचं भविष्य; १ मिनिटात होऊ शकता लखपती, कसं ते जाणून घ्या
उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला एकत्र आणण्यासाठी ‘ही’ अभिनेत्री मैदानात, मोदींना घातलं साकडं
‘घरात घुसून मारलं होतं ना..’; या बॉलिवूड दिग्दर्शकावर संतापली कंगना राणावत
जबरदस्त प्रेमकहाणी आणि सुपरहिट ऍक्शन, वाचा थॉर: लव्ह ऍन्ड थंडरचा रिव्ह्यु