महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. अखेर २ फेब्रुवारीला वनिताचे लग्न पार पडले आहे. वनिता खरात आणि सुमीत लोंढे यांचे लग्न पार पडले आहे. या लग्नाला हास्यजत्रेतील कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु होते. त्यासाठी त्यांची धावपळ सुद्धा सुरु होती. लग्नाच्या आधी जेव्हा वनिताचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला, तेव्हा कलाकर कार्यक्रमात नाचून चांगलाच धिंगाणा करताना दिसून आले आहे.
वनिताला पारंपारिक दागिने खुप आवडतात. त्यामुळे लग्नातही ती पारंपारिक दागिने घालताना दिसून आली. तिची ही खास इच्छा प्राजक्ता माळीने पुर्ण केली. प्राजक्ताने नुकताच प्राजक्तराज नावाचा आपला ब्रँड सुरु केला आहे. ते दागिने प्राजक्ताने वनिताला भेट दिले आहे.
प्राजक्ताने वनिताला खास सोनतळा कलेक्शनमध्ये दागिने भेट केले आहे. त्या कलेक्शनमधले गहू तोडे, पैलू पाटली, एकेरी मोती बांगडी हे दागिने वनिताने घातले होते. तसेच बेव पानटिक, वज्रटिक, मोहनमाळ असे बरेच दागिने वनिताला प्राजक्ताने भेट दिले होते.
https://www.instagram.com/p/CoKuYEAya7a/?igshid=OGQ2MjdiOTE=
वनिता आणि सुमीतची भेट लॉकडाऊन दरम्यान झाली होती. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. गेल्यावर्षी जानेवारीमध्येच त्यांनी लग्न करायला काही हरकत नाही, असे ठरवले होते.
तसेच आपण लवकरच लग्न करणार आहोत अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावर सुद्धा दिली होती. तेव्हापासून त्यांचे चाहते लग्नाची वाट पाहत होते. अखेर २ फेब्रुवारी रोजी त्यांचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला आहे. या लग्नाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
महत्वाच्या बातम्या-
या फोटोत तुम्हाला फक्त ५२८ हा आकडा दिसत असेल तर व्हा सावध, तुमची नजर कमजोर झालीय
स्वतःच घर असल्यागत ४ वर्षे मॉलमध्ये राहिला, कुणाला कळलंही नाही; ‘ही’ एक चूक झाली अन् सगळंच उघडं पडलं
वर्ल्डकप विजेता महिला खेळाडूंचा सचिनने केला सन्मान; करोडोंची बक्षिसे पाहून शेफाली झाली खुश