अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या तीन अतिशय आवश्यक अशा गरजा आहेत. यापैकी एकही गरज एकही गोष्टीची कमतरता असली तर जीवन मात्र अपेष्टेने भरून जाते. या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक माणूस आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आपल्या कुटुंबाला चांगल्या सोयी देण्याचा प्रयत्न हा प्रत्येक व्यक्ती करत असतो, मग ती स्त्री असो का पुरुष.
डोक्यावर छप्पर नाही म्हणून ही गरज पूर्ण करण्यासाठी करण्यासाठी एक व्यक्ती मॉलमध्ये चक्क चार वर्षांपासून राहत होता. कोणालाही पत्ता न लागता, चार वर्ष एकाच मॉलमध्ये राहणे हे नवलच! कमीत कमी खर्च कसा होईल आणि त्यातून निवाऱ्याची सोय बरेच लोक करत असतात. परंतु या व्यक्तीने तर कळसच गाठला आहे. ही माहिती मिळताच त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना अमेरिकेच्या रोड आयलँड येथे घडली असून मायकल टाउनसेंड असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी चार वर्षांपासून एका मॉलमध्ये लपून राहत होता. 2003 मध्ये मायकल जेथे राहत होते ती बिल्डिंग कोणीतरी विकत घेतल्यामुळे मायकल बेघर झाले. ते शहरातील ऐतिहासिक मिल इमारतीत राहत होते.
बिल्डिंगचे पुनर्वसन करणार आहे असे त्या बिल्डरने मायकल यांना सांगितले. यामुळे मायकल हे त्या बिल्डरचे इतर प्रकल्प पाहण्यासाठी गेले असता त्यांना तेथे प्रॉव्हिडंस प्लेस मॉल्सचा समावेश असल्याचे कळले. या मॉलमध्ये एक जागा अशी होती जी कोणीही वापरत नसल्याचे मायकल यांना कळाले.
या रिकाम्या जागेचा वापर करून मायकल यांनी तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. तब्बल चार वर्षे कोणालाही न कळता मायकल या रिकाम्या जागेत राहू लागले. मात्र अखेर २००७ मध्ये या साऱ्या गोष्टीचा भांडाफोड झाला. सुरुवातीपासूनच मायकलच्या डोक्यात काहीतरी वेगळेच होते.
बांधकाम व्यवसायिकांना भेटून त्यांची फिलॉसॉफी जाणून घेण्याचा प्रयत्न मायकल करत होता. एखादी जागा पडीक असेल तर त्याचा विकास करणे हे बांधकाम व्यवसायकांची जबाबदारी असते ,असे त्याच्या लक्षात आले. जेव्हा तो या मॉलमध्ये ही अविकसित जागा पाहण्यासाठी गेला, आणि ती आपली जबाबदारी आहे असे त्याचा समज होता.
नऊ मजली इमारत असलेला या मॉलमध्ये मायकल यांनी ७५० स्क्वेअर फुट जागा विकसित करून तेथे राहत होते. परंतु गुन्हेगार काहीतरी चूक करतो त्याप्रमाणे मायकल कडून एक चूक झाली त्याने एका चिनी कलाकाराला आपल्या घरी बोलावले आणि त्या कलाकाराला कोणीतरी पाहिले. आणि या कलाकाराला पाहताच, मायकल चे भांडे फुटले.
महत्वाच्या बातम्या
Ram Temple : २०२३ मध्ये बांधकाम पुर्ण झाल्यावर कसे दिसेल भव्य राममंदिर? ट्रस्टने शेअर केले खास फोटो
विधानपरीषद निवडणुकीत फडणवीसांचा नवा डाव! सत्यजित तांबे नव्हे तर ‘या’ उमेदवाराला पाठिंबा देणार?
“रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण…”