पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहामधील कार्यक्रमात काल भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे काल पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी होती. या कार्यक्रमाला भाजपच्या महिला नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील उपस्थित होत्या.
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या कार्यक्रमस्थळी म्हणजेच बालगंधर्वमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वैशाली नागवडे यांना जबर मारहाण करण्यात आली. वैशाली नागवडे यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली नागवडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करुन शिवीगाळ करणं, धमकावणं, अश्लील हातवारे करणे याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळलेल्या माहितीनुसार, बसवराज तिकोने, प्रमोद कोंढरे, मयूर गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा नेमकं काय घडलं होतं..? भाजपच्या महिला नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी काल पुणे दौऱ्यावर होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी वास्तव्यास असलेल्या हॉटेलसमोर आंदोलन केलं आहे. इंधन दरवाढीवरून आणि महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या भाषणाला सुरवात होण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणा देण्यास सुरवात केली. राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या कार्यक्रमस्थळी म्हणजेच बालगंधर्वमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे तेव्हा वैशाली नागवडे यांना जबर मारहाण करण्यात आली. पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत राष्ट्रवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर काढले. या संपूर्ण घटनेमुळे सध्या बालगंधर्व नाट्यगृह परिसरात सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्याचा राजीनामा; हिंदुत्वाचा विसर पडला म्हणत थेट उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य
शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला म्हणत उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीने ठोकला पक्षाला रामराम
मोठ्या कष्टाने एकट्या आईने ६ मुलांना वाढवले आणि देशाला मिळाला कपिल देव सारखा महान खेळाडू
आयपीएलमध्ये फिक्सिंग? ऋषभ पंतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण