संपूर्ण देशाच लक्ष पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे. आता सुरुवातीचे कल हाती येत असून या कलांमध्ये भाजपनं बहुतांश ठिकाणी आघाडी घेतल्याचं कळतं आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ जागांवर मतदान झाले आहे. पैकी सरकार स्थापनेसाठी २०२ एवढ्या बहुमताची गरज लागणार आहे.
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, 316 जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप 200 जागांसह आघाडीवर आहे. तर सपा 105 जागा, बसप, 05, अन्य 03, काँग्रेस 03 जागांवर आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे.
निकालाबाबत बोलताना मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी विश्वास व्यक्त केला आहे. “मी देवाला प्रार्थना केली आहे की, येणारी पाच वर्षे गेल्या ५ वर्षांसारखीचं शांतता आणि विकासाची असतील. भाजपा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल,” असा विश्वास एन बिरेन सिंह यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मणिपूरमध्ये भाजप 15 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तर काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तर एनपीपी 9 जागांवर आघाडीवर आहे. मणिपूरमध्ये एकूण विधानसभेच्या 60 जागा आहेत. त्यामध्ये जो पक्ष 31 जागांवर विजय संपादन करेल त्या पक्षाचे मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करणार आहे.
तर पंजाबमध्ये आपनं चांगलीच मुसंडी मारल्याचं सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय. आप 45 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सध्या काँग्रेस 17 तर भाजप 14 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पंजाबात काॅंग्रेसची पुन्हा जोरदार मुसंडी; आपचा वेग मंदावला
गोव्यात काँग्रेसचे सरकार येणार, काँग्रेसची २० जागांवर आघाडी; भाजप मात्र पिछाडीवर
उत्तराखंडात भाजप-काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर; हरीश रावत म्हणाले, देवाची कृपा आहे, काँग्रेसच येणार
‘हा’ ५ रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची चढाओढ, १ लाखांचे केले तब्बल २७ कोटी